अजित पवारांचा शिवसेना, मनसेवर डबल बार

संपुर्ण देशात दिवाळी आनंदात साजरी होत असताना काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे यात सर्वात अग्रगण्य असतात.

Updated: Oct 20, 2017, 07:15 PM IST
अजित पवारांचा शिवसेना, मनसेवर डबल बार

बारामती : संपुर्ण देशात दिवाळी आनंदात साजरी होत असताना काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे यात सर्वात अग्रगण्य असतात.

बारामतीतील माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासुन शरद पवार स्वतः जातीनं उपस्थित राहतात. त्यांच्यासोबत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सर्व पवार कुटुंबिय एकत्र येऊन पाडव्याचा दिवस कार्यकर्ते, पक्षातील नेत्यांसाठी देत असतात.

गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेला पवारप्रेमींनी यंदाही भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.