पदार्थ झणझणीत बनवण्यासाठी काय वापरावं? लाल मिर्ची पावडर की ताज्या हिरव्या मिरच्या?

जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल, तर लाल मिर्ची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. ती शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते. 

Updated: Feb 10, 2025, 03:29 PM IST
पदार्थ झणझणीत बनवण्यासाठी काय वापरावं? लाल मिर्ची पावडर की ताज्या हिरव्या मिरच्या? title=

Kitchen Food Tips: आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये लाल तिखट हा एक महत्त्वाचा घटक आहे. तिखट घातल्याशिवाय पदार्थांना चव येत नाही. तिखटाचा वापर करून आपण अनेक भाज्या, वरण आणि आमटीचे प्रकार आपल्या रोजच्या जेवणात करत असतो. आजकाल मसाल्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. लाल मिरची पावडर जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात वेगवेगळे प्रिझर्वेटीव्ह वापरले जातात. हे प्रिझर्वेटीव्ह शरिरासाठी अतिशय धोकादायक ठरतात. त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना पदार्थ तिखट बनवण्यासाठी लाल मिर्चीचा वापर न करता ताज्या हिरव्या मिरच्या वापरा.

ताजी हिरवी मिरची आणि तिखट लाल मिर्ची दोन्ही चवीला तिखट असतात. पण आरोग्याच्या दृष्टीने पाहता, हिरवी मिरची अधिक फायदेशीर आहे. जास्त प्रमाणात लाल तिखट खाल्ल्यास ते हृदयासाठी घातक ठरू शकते, तर हिरवी मिरची शरीरासाठी अनेक लाभ देऊ शकते.

पचनासाठी फायदेशीर

हिरव्या मिरचीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असते, जे पचनतंत्र मजबूत करण्यात मदत करते. हिरव्या मिरचीचाचा उपयोग तुम्ही सलाडमध्ये करू शकता. तिच्या बिया देखील पचनासाठी चांगल्या असतात आणि पोटाच्या समस्या दूर ठेवतात.

वजन कमी करण्यास मदत

हिरव्या मिरचीमध्ये "कॅप्साइसिन" नावाचा घटक असतो, जो शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतो. हा घटक शरीराचे तापमान वाढवतो आणि मेटाबॉलिझम सुधारतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका कमी होतो

हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील हानिकारक पेशींना नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

हे ही वाचा: डायबिटिसवर 'हे' काळं फळ ठरेल रामबाण उपाय, High Sugar चा मागमूसही राहणार नाही

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली

हिरव्या मिरचीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच, ती रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करते.

डोळ्यांच्या आरोग्यास फायदेशीर

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन A आणि C असते, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारतात.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)