'या' धान्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधलं सुपरफुड; तुमच्या आहारात करता का यांचा समावेश?

Pariksha Pe Charcha 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अभ्यास, आरोग्य आणि जीवनशैलीबद्दल चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या काही महत्त्वाच्या सुपरफूडबद्दल सांगितले या वेळी त्यांनी काही धान्यांचा उल्लेख केला. 

Updated: Feb 10, 2025, 05:13 PM IST
'या' धान्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधलं सुपरफुड; तुमच्या आहारात करता का यांचा समावेश? title=

Pariksha Pe Charcha 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी काही धान्यांना सुपरफुड असे संबोधले. धान्य (Millets) हे केवळ आरोग्यासाठीच चांगले नाहीत, तर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहेत. म्हणूनच, आपल्या आहारात त्यांचा समावेश करून निरोगी जीवनशैली स्वीकारणे ही एक चांगली सवय ठरू शकते.

धान्य का महत्त्वाचे आहेत?

पंतप्रधानांनी संवादादरम्यान 'मोटे धान्य' असा शब्द वापरला. मोटे धान्य म्हणजेच बाजरी, नाचणी, ज्वारी यांसारखे धान्य. या धान्यांचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो. हे पोषणाने भरपूर असून शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्याशिवाय या धान्यांना उगवणे पर्यावरणपूरक असते. म्हणूनच त्यांना सुपरफूड म्हटले जाते.

धान्यांचे आरोग्यदायी फायदे

1. पोषणाने भरपूर

मिलेट्समध्ये प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
हाडे, स्नायू आणि पचनसंस्था बळकट करतात. शरीरास आवश्यक पोषण देऊन ऊर्जा वाढवतात.

2. मधुमेहासाठी फायदेशीर

मिलेट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो, त्यामुळे हे रक्तातील साखर झपाट्याने वाढवत नाहीत.
मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे चांगला पर्याय आहे.

3. पचनक्रिया सुधारते

फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.

4. वजन कमी करण्यास मदत

फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक कमी लागते आणि लठ्ठपणा टाळता येतो.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

5. हृदयासाठी लाभदायक

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून हृदयासाठी फायदेशीर ठरते.
चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास मदत करते, रक्तदाब संतुलित ठेवते.

हे ही वाचा: सुदृढ आणि निरोगी गर्भधारणेसाठी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले 5 टीप्स

6. ग्लूटेन-फ्री आणि अ‍ॅलर्जीपासून सुरक्षित

गहू किंवा इतर धान्यांना अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांसाठी मिलेट्स एक उत्तम पर्याय आहे, कारण ते ग्लूटेन-फ्री असतात.

7. पर्यावरणपूरक शेती

मिलेट्सची लागवड कमी पाणी, कमी खत आणि कमी कीटकनाशकांमध्ये शक्य होते.
कोरड्या हवामानातही सहज उत्पादन होते, त्यामुळे पर्यावरणास अनुकूल आहे.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)