Makar Sankranti 2025: भारतात विविध भागांमध्ये मकर संक्रांती हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते आणि गंगा स्नानालाही महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची एक खास परंपरा आहे. या दिवशी आकाश विविध रंगांच्या पतंगांनी भरून जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद घेतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकत्र येऊन पतंग उडवतात, ज्यामुळे सामाजिक एकता वाढते. लहान मुलांसाठी हा खेळ आनंददायक असतो, तर मोठ्यांना त्यांचे बालपण आठवते.
रामायणानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी पहिल्यांदा पतंग भगवान श्रीराम यांनी उडवली होती. श्रीरामांची पतंग इतकी उंच उडली की ती इंद्रलोकापर्यंत पोहोचली. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली. पतंग उडवणे शुभ आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते.
मकर संक्रांतीचा सण केवळ आनंदाचा नाही तर तो आरोग्य, परंपरा आणि सामाजिक एकता यांचेही प्रतीक आहे. त्यामुळे सावधानता बाळगुन हा सण साजरा करा. जाणून घ्या या वेळी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
1. पतंग उडवताना इलेक्ट्रिक वायरपासून दूर रहा. पतंगाचा मांजा विद्युत खांब, विद्युत वायरींच्या संपर्कात आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. पतंग उडविताना विद्युत यंत्रणेपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन वीज कंपन्या दरवर्षी करत असतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वीज कंपनीच्या जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.
2. इतरांच्या सामनाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. शक्यतो मोकळ्या मैदानात पतंग उडवले पाहिजे. जेणेकरुन कोणाच्या मलमत्तेची हानी होणार नाही. काही दुखापत झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
3. वापरलेला मांजा आणि पतंग योग्य प्रकारे फेकुन देणे गरजेचे आहे. विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेला पतंग व मांजा काढण्याचा प्रयत्न करु नये. फक्त सुती धाग्याने बनवलेला मांजा वापरावा. लाहान मुलांना या विषयी सुचना आधीच द्यायला हव्या. ज्यामुळे मोठ्या दुर्घटना टाळता येतील.
4. आपण मकर संक्रांतीला नेहमी नायलॉन मांज्यामुळे कित्येक बळी गेल्याच्या बातम्या ऐकतो. म्हणून हे लक्षात घ्या, मांजामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे घरा बाहेर पडताना स्वतःची व मुलांची काळजी घ्या.
5. लहान मुलांना गच्चीवर एकटे जाऊ देऊ नका. मोठ्यांसोबतच राहण्याच्या सुचना द्या.
हे ही वाचाः मकर संक्रांतीच्या दिवशी घरी चिमुकल्याचा जन्म झालाय? द्या अतिशय युनिक आणि हटके नाव
पतंग उडवताना अनेक अपघात होत असतात पण जर आपण अति उत्साही न होता. काळजीपुर्वक हा सण साजरा केला तर याचे अनेक आरोग्यादायी फायदे मिळु शकातात.
मकर संक्रांती सण थंडीच्या ऋतुमध्ये येतो. या काळात ऊन मिळवणे अत्यंत गरजेचे असते. सकाळच्या वेळेस गच्चीवर पतंग उडवल्याने शरीराला कोवळा सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे शरीराला जीवनसत्त्व-डी (Vitamin D) मिळते.
1. आरोग्यासाठी फायदे: जीवनसत्त्व-डी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते.
2. शारीरिक हालचाली: पतंग उडवताना शारीरिक व्यायाम होतो, ज्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि प्रतिकारशक्ती सुधारते.
3. मानसिक स्वास्थ्य: थंड वातावरणामुळे मूड डाउन होतो. पतंग उडवल्याने आनंद वाटतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.