मुंबई, रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावर कासवांना जिवदान

मुंबईच्या जुहू चौपाटीवरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला वाचवण्यात आले. तर गुहागरात दोन कासवाना जिवदान देण्यात आले.

Updated: Jul 8, 2018, 10:55 PM IST
मुंबई, रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावर कासवांना जिवदान title=

मुंबई / रत्नागिरी  : मुंबईच्या जुहू चौपाटीवरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला वाचवण्यात आले. उजवीकडचे दोन्ही पाय नसलेला हा कासव डिहाड्रेशनमुळे समुद्र किनारी आला होता.. अशक्तपणामुळे त्याला समुद्रात परत जाणं शक्य झालं नाही आणि तो किनाऱ्यावरच अडकला.  स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलीस आणि सर्प नावाच्या संस्थेने या कासवावर प्रथमोपचार केले.  वैद्यकीय तपासणी नंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. 

रत्नागिरीतील गुहागर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले आहे. ही दोनही कासवं किनाऱ्यावरील जाळ्यात अडकली होती. स्थानिकांनी या दोनही कासवांच्या पायातील जाळं बाजुला केलं आणि त्यांना पुन्हा समुद्रात सोडून दिलं.