Viral Video : देवाच्या दारी गेलं असता अनेकदा भक्तांची विविध रुपं पाहायला मिळतात. कोणी देवाशी एकट्यातच संवाद साधताना दिसतं, कोणी या शक्तीवर विश्वास ठेवून त्यापुढे नतमस्तक होताना दिसतं. काही भक्त तर, इतके देवभोळे असतात की त्यांना पाहून नेमकं काय म्हणावं हेच लक्षात येत नाही. सोशल मीडियावर अशाच काही भक्तांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार मथुरेच्या बाँके बिहारी या कृष्णमंदिरामध्ये एक विचित्र प्रकार घडला. जिथं, एका गजमुखातून येणारं पाणी पिण्यासाठी भक्तांमध्ये लगबग पाहायला मिळाली. कोणी ग्लासानं, कोणी हातानं हे पाणी तीर्थ समजून पिऊ लागलं. कोणी ते आदरानं, श्रद्धेनं डोळ्यांना लावलं, डोक्यावर फिरवलं. हे पाणी म्हणजे देवाचं चरणामृत असून, ते तीर्थ समजून हे भक्त पिऊ लागले.
प्रत्यक्षात हे पाणी एअर कंडिशनरमधील अर्थात AC तून बाहेर पडणारं पाणी होतं. बरं, तिथं असणाऱ्या एका भक्तानं तीर्थ समजून ते प्राशन करणाऱ्या भक्तांच्या हा प्रकार लक्षात आणूनही दिला. पण, त्यांच्यावर फारसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही. उलटपक्षी हे भक्त जणू काहीच घडलं नही, या अविर्भावानं तिथून पुढे जाताना दिसले.
Serious education is needed 100%
People are drinking AC water, thinking it is 'Charanamrit' from the feet of God !! pic.twitter.com/bYJTwbvnNK
— ZORO (@BroominsKaBaap) November 3, 2024
X च्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अतिशय महत्त्वाची बाब लिहिण्यात आली आहे. 'इथं शंभर टक्के शिक्षणाची गरज आहे. लोकं एसीच्या पाण्याला चरणामृत समजून पिऊ लागली आहेत', असं लिहित शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला पाहत इतरही नेटकरी व्यक्त झाले आहेत. काहींनी भक्तिभावाच्या नावाखाली सुरू असणारा अंधविश्वास आणि तत्सम गोष्टींवर लक्ष वेधल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?