अध्यात्मिक गुरु जया किशोरी वादाच्या भोवऱ्यात; 2 लाखांची बॅग अन् एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी हडबडले

Jaya Kishori Dior Bag: बापरे; प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेली बॅग? नेटकऱ्याच्या दाव्यामुळं चर्चांना आणि रोषात्मक प्रतिक्रियांना उधाण....   

सायली पाटील | Updated: Oct 28, 2024, 01:58 PM IST
अध्यात्मिक गुरु जया किशोरी वादाच्या भोवऱ्यात; 2 लाखांची बॅग अन् एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी हडबडले title=
viral news Spiritual preacher Jaya Kishori grabs attantion for carrying 2 lakh Dior bag

Jaya Kishori Dior Bag: 'आपकी आदते ही आपका भविष्य तय करती है' असं म्हणणाऱ्या, भौतिक सुखाचा त्याग करण्याची शिकवण देणाऱ्या आणि कृष्णाच्या भक्तीत तल्लिन होणाऱ्या अध्यात्मिक गुरु जया किशोरी कायमच चर्चेत असतात. त्यांची किर्तनं, भजनं रील आणि व्हिडीओ स्वरुपात सोशल मीडियावर कमाल गाजतात. अशा या जया किशोरी आता म्हणे एका वेगळ्या, किंबहुना भलत्याच कारणामुळं चर्चेत आल्या आहेत. कारण ठरतेय ती म्हणजे अध्यात्माकडे पाहण्याची त्यांची भूमिका आणि त्याच्या विरुद्ध वागणूक. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळं कथावाचक जया किशोरी यांच्यावर अनेकाचाच रोष ओढावला आहे. तर, त्यांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. व्हायरल व्हिडीओमुळं करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार जया किशोरी या एअरपोर्टवर ज्या बॅगसह दिसत आहेत, ती बॅक एका लक्झरी ब्रँडची असून, तिची किंमत साधारण 2 लाखांहून अधिक आहे. 

X च्या माध्यमातून करण्यात आलेल्या एका पोस्टमधून जया किशोरी यांच्या एअरपोर्ट लूकसंदर्भातील ही माहिती देण्यात आली. ज्यानुसार, 'अध्यात्मिक गुरू जया किशोरी यांनी 210000 रुपयांची बॅग नेतानाचा हा व्हिडीओ डिलीट केला. बरं या त्याच आहेत, ज्या भौतिक सुखाविषयी बोलतात, स्वत:ला कृष्णभक्त म्हणवतात... आणि एक गोष्ट, डिऑरची ही बॅग वासरांच्या चामड्यापासून तयार केली जाते म्हणे...'

हेसुद्धा वाचा : SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड 

सोशल मीडियावर जया किशोरी यांच्या या व्हिडीओची बरीच चर्चा सुरु झाली. नेटकऱ्यांनी तर, क्रिस्टीयन डियॉरच्या संकेतस्थळावर जाऊन त्या बॅगेची खरी किंमतही जाणून घेतली. तिथंही किंमत 2 लाखांहून जास्त असल्याचं पाहायला मिळालं आणि मग, अध्यात्मिक गुरूंची शिकवण आणि प्रत्यक्षातील त्यांचं आयुष्य यामध्ये असणारी तफावत लक्षात आली.