Viral Breakup : 'मी 20 रुपयाचे मोमो खातो आणि ती...', Vanshika च्या Breakup Story वर आकाशचं सडेतोड उत्तर

Vanshika ची कहाणी व्हायरल झाल्यानंतर आता आकाशची बाजू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Dec 10, 2022, 03:55 PM IST
Viral Breakup : 'मी 20 रुपयाचे मोमो खातो आणि ती...', Vanshika च्या Breakup Story वर आकाशचं सडेतोड उत्तर  title=

Viral Breakup Of Vanshika and Aakash : आपण बरीच वर्षे कोणासोबत रिलेशनशिपमध्ये राहिलो आणि काही कारणांमुळे जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा प्रत्येकाला दु: ख होते. काही वेळा बरेच लोक हे दु: ख कोणासोबत शेअर करत नाहीत. मात्र, काही लोक त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत हे शेअर करत असतात. तेव्हा त्यांचे मित्रच त्यांच्या मदतीला त्यांची साथ देण्यासाठी येतात. अनेकदा तर हे मित्र ब्रेकअपची चेष्टा करतात. ते त्यांच्या मित्राच्या ब्रेकअप विषयीच सगळ्यांना सांगत खिल्ली उडवतात. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आला होता. त्या मुलीचं नाव वंशिका असं होतं. वंशिका तिचा बॉयफ्रेंड आकाशनं कशा प्रकारे तिच्यासोबत ब्रेकअप केला हे सांगितलं. दरम्यान, तिची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड आकाशची कॉल रेकॉर्डिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाहा काय म्हणाला आकाश -

खरं तर, ज्या प्रकारे वंशिकानं तिच्या एक्स बॉयफ्रेंड आकाशवर आरोप केले होते, त्याच पद्धतीनं आकाशनेही उत्तर दिले आहे. हा किस्सा सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. आकाशने सांगितले की जर या मुलीच्या मागे मुलांची लाईन असेल तर करीना कपूर बनून सगळ्यांना नाकारायची काय गरज होती. जर कोणी दोन महिन्यांच्या रिलेशनशिपसाठी लग्नाची तयारी करत असेल तर मी काय करावे?

इतकंच नाही तर आकाशने शॉपिंगपासून ते बिलापर्यंत सर्व गोष्टींबद्दल सांगितलं. ती मॅच माझ्यासाठी नाही तर तिला रोनाल्डो आवडतो म्हणून पाहत आहे. खरंतर तिला रोनाल्डोचा गेम कळत सुद्धा नाही तर तो हॉट आहे म्हणून ती फूटबॉल बघते. मी 20 रुपयाचे रस्त्यावरील मोमोज खातो पण ती 550 रुपयांचे 50 ग्रॅम भात मला घ्यायला सांगते आणि ही पैसे वाचवण्याविषयी बोलते. ब्रेकअप तर झालाच असता. 

हेही वाचा : "मेरा सोना, बाबू..." करूनही आकाशनं केलं ब्रेकअप, वंशिकाची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान वंशिकाच्या मैत्रिणीन तिचा फोन स्पीकरवर ठेवला आणि ऑडिओ कॉल दुसऱ्या फोनवरून रेकॉर्ड केला. ऑडिओ कॉलमध्ये वंशिका तिच्या दोन महिन्याचं रिलेशनशिप कसं संपलं या विषयी सांगताना दिसते. वंशिका तिच्या मैत्रिणीनं विचारलं की काय झालं? तेव्हा वंशिका बोलते, 'माझ्या आणि आकाशच्या दोन महिन्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी मी थ्रेडिंग, वॅक्सिंग हे सर्व केले होते. एवढं दुखत होतं की पार्लरच्या बाईसमोर मी ओरडू लागले आणि त्या मुलाचा अॅटिट्यूड बघ, म्हणाला मी आपल्या रिलेशनशिपविषयी मला शाश्वती नाही. त्यानंतर वंशिका अनेक गोष्टी तिच्या मैत्रिणीला सांगते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 9 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा संपूर्ण व्हिडीओ 2 मिनिटे 20 सेकंदांचा आहे. हा व्हिडीओ शेअर करत हे सगळ्यात मजेशीर ब्रेकअप सेशन असल्याचं अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे.