Silkyara Tunnel Rescue Operation: उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरु असून आज सतराव्या दिवशी गुडन्यूज मिळण्याची शक्यता आहे. रॅट होल माईनिंग (Rat-hole mining) आणि बोगद्याच्या वरुन वर्टिकल ड्रिलिंग करण्यात येत असून कामगारांपासून आता केवळ तीन मीटर दूर आहेत. आज कामगारांना (Workers) बोगद्यातून बाहेर काढलं जाण्याची शक्यता आहे. बोगद्याच्या बाहेर हालचाली वाढल्या असून बोगदाच्या बाहेर अॅम्ब्यूलन्स आणि डॉक्टरांचं पथक तैनात ठेवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबियाना कामगारांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यात सांगण्यात आलं असून कामगार बाहर येताच त्यांचे चेहरे झाकून त्यांना थेट रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.
बचाव कार्यात अनेक अडचणी येत असल्याने कामगारांची सुटका लांबली आहे. कधी पाऊस तर मशीन खराब झाल्याने बचावात अडथळे निर्माण झालेत.
कामगारांना रुग्णालयात भरती करणार
सिलक्यारा बोगद्यात 41 कामगार गेले सतरा दिवस अकडून पडले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांची वैद्यकीत तपासणी केली जाणार आहे. रुग्णालयात त्यांचा बीपी, हार्टबीट, शुगर सर्व तपासण्या केल्या जातील. सलग सतरा दिवस अंधाऱ्या बोगद्यात अडकून पडल्याने कामगारांना हायपर टेन्शनचा त्रास होऊ शकतो. तसंच एंजायटीही वाढू शकते. हे सर्व लक्षात घेऊन त्यादृष्टीने सर्व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
सतरा दिवस कामगारांच्या डोळ्यासमोर सतत तीव्र अंधार आहे. त्यामुळे कामगार बोगद्याच्या बाहेर येतातच त्यांचे डोळे अचानक आलेला उजेड सहन करु शकत नाहीत. अशात त्यांच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगद्यातून बाहेर येताच त्यांचे चेहरे झाकेल जातील. त्यानंतर हळूहळू त्यांना उजेडात आणलं जाईल. गेले सतरा दिवस डोक्यावर सतत मृत्यूचा धोका सतावत असल्याने या कामगारांची माननसिकी स्थिती देखील तपासली जाणार आहे.
12 नोव्हेंबरपासून कामगार अडकले
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 30 किलोमीटर दूर असलेल्या सिलक्यारा इथं केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला 'ऑल वेदर सडक' प्रकल्पा सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर 4.5 किलोमीटरचा बोगदा तयार केला जात आहे. 12 नोव्हेंबरला बोगद्याचा एका बाजूचा भाग कोसळला आणि बोगदा बंद झाला. यात 41 कामगार आतच अडकले. त्यानंतर गेले 16 दिवस या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज सतरावा दिवस आहे.