'या' क्षेत्रात निर्माण होणार तब्बल ३० लाख नोक-या

देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, येत्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात नोक-यांची संधी उपलब्ध होणार आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 17, 2017, 07:43 PM IST
'या' क्षेत्रात निर्माण होणार तब्बल ३० लाख नोक-या title=
Representative Image

नवी दिल्ली : देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, येत्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात नोक-यांची संधी उपलब्ध होणार आहे.

देशात फोरजी टेक्नोलॉजीचा वापर करत इंटरनेट डेटात होणारी वाढ, बाजारात आलेल्या नव्या कंपन्या, स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता यामुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये २०१८ पर्यंत देशात तब्बल ३० लाख नोक-या उपलब्ध होणार आहेत. अभ्यासकांनी केलेल्या अहवालात हा दावा केला आहे.

असोचॅम आणि केपीएमजी यांनी संयुक्तरित्या केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, ५G, M२M यांसारख्या टेक्नोलॉजीमुळे इन्फर्मेशन अँड टेक्नोलॉजी (ICT) मध्ये २०२१ पर्यंत ८,७०,००० लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 

या अहवालात म्हटलं आहे की, टेक्नोलॉजी सेक्टरमधील मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक लोकांची गरज भासणार आहे. स्किलची कमी पूर्ण करण्याची गरज आहे. यासाठी इंफ्रा आणि सायबर सिक्यूरिटी एक्सपर्ट, अॅप डेव्हलपर, सेल्स एक्झिक्यूटीव्ह, इन्फ्रास्ट्रक्चर टेक्निशन, हँडसेट टेक्निशन या स्वरुपात स्किल्ड मॅनपॉवरची आवश्यता असणार आहे.

इतकेच नाही तर सध्याच्या स्थितीत काम करणा-यांनाही टेक्नोलॉजीसंदर्भात अपडेट रहावं लागणार आहे.