'तो' ड्रग्ज डिलर सुशांतला का भेटला, सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

सर्वांच्याच नजरा आता या प्रकरणाकडे वळल्या आहेत. 

Updated: Aug 25, 2020, 11:32 AM IST
'तो' ड्रग्ज डिलर सुशांतला का भेटला, सुब्रमण्यम स्वामींचा सवाल
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दर दिवशी नवा गौप्यस्फोट होत असतानाच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक महत्त्वाचा आणि सर्वांच्या भुवया उंचावणारा प्रश्न उपस्थित केला आहे. 

सुशांत आत्महत्या प्रकरणी स्वामी यांनी ट्विट करत दुबईतील ड्रग डिलर आणि सुशांतची भेट नेमकी का झाली होती, असा प्रश्न मांडला. त्यामुळं सर्वांच्याच नजरा आता या प्रकरणाकडे वळल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली नसून ही हत्या आहे, असा दावा स्वामी यांनी यापूर्वीही केला होता. शिवाय या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठीही ते आग्रही होते. त्यातच आता त्यांनी या आत्महत्या प्रकरणातील दुबई कनेक्शनविषयी मुद्दा मांडत सर्वांचं लक्ष वेधलं. 

सुनंदा पुष्कर प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर जी बाब समोर आली त्यातून मोठी उकल झाली होती, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 'सुशांत आणि श्रीदेवी प्रकरणात मात्र असं काहीच झालं नाही. उलट या प्रकरणामध्ये दुबईतील ड्रग डिलर अयाश खान आणि सुशांतचीय त्याच्या मृत्यूच्या दिवशी भेट का झाली होती?', असं ट्विट स्वामी यांनी केलं.

 

अभिनेता सुशातं सिंह राजपूत यानं आत्महत्या करुन दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला. मात्र अद्यापही या प्रकरणी कोणतीही उकल झालेली नाही. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यातच आता काही मंडळींनी यामध्ये गौप्यस्फोट केल्यामुळं संपूर्ण प्रकरणालाच दर दिवशी एक नवं वळण मिळत आहे.  

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x