Stone Pelting From Sky : आकाशातून तारा अथवा उपग्रह तूटून पडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतीलच.मात्र प्रथमच आकाशातून दगड पडत (Stone Pelting From Sky) असल्याची रहस्यमय घटना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरीक आता भीतीत जगतातयत. दरम्यान या घटनेमागचं गुढ काय आहे. हे शोधण्या मागचा प्रयत्न सूरू आहे.
सीमावर्ती बाडमेर (Barmer) जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील उंडाखा गावात असलेल्या एका घरावर (Mysterious House) अचानक आकाशातून गूढ पद्धतीने दगड पडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दगड सतत पडत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरीकांना नेमकी ही घटना काय घडतं आहे हेच कळत नाही आहे.
उंडाखा गावातील एका घरावर सलग 3 दिवस दगडफेक (Stone Pelting)झाली आहे. या दगडफेकी दरम्यान कोणीही व्यक्ती दिसली नाही आणि जेव्हा हे दगड घरात पडतात तेव्हा कोणालाही दुखापत देखील झाली नाही. त्यामुळे नागरीकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गेल्या 3 दिवसांपासून कुटुंबासह गावातील लोक भयभीत आहे. तसेच आज सलग तिसऱ्या दिवशी सदर पोलीस ठाण्याचे पोलीस, बारमेरचे पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व लोकप्रतिनिधीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्यासमोर देखील आकाशातून दगडांचा (Stone Pelting From Sky) वर्षाव झाला आहे. त्यामुळे पोलीस देखील ही घटना पाहून अचंबित झाले आहेत.
दरम्यान या घटनेप्रकरणी बारमेरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक भार्गवही घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनीही त्या घराभोवती पोलीस तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच पोलिसांना सदैव जागरुक राहावे आणि कॅमेरे लावून व्हिडिओग्राफी करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
गेल्या 3 दिवसांपासून आमच्या घरावर अशा प्रकारे आकाशातून दगड पडत (Stone Pelting From Sky)आहेत, अनेक लोक या घटनेला अंधश्रद्धेशीही जोडत आहेत, मात्र हे दगड कुठून पडत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
दगड पडल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. येथे खरोखरच दगड पडत आहेत, आता या घरात दगड कुठून येत आहेत हे तपासानंतरच कळणार आहे. कारण आजूबाजूला अशी कोणतीही जागा नाही जिथून दगडफेक करता येईल किंवा दूरवर देखील घरही नाही. कोठेही दगडफेक करणे ही खरोखरच आश्चर्यकारक घटना आहे, असे सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले.
ही सर्व अंधश्रद्धा असून कुटुंबीयांशी बोलून या कुटुंबाचे समुपदेशन केले जाईल, तसेच दगडफेक करणाऱ्यांमध्येही काही खोडकरांचा हात असू शकतो.या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे बाडमेरचे उपविभाग अधिकारी समुंदर सिंह यांनी सांगितले.
राजस्थानच्या बाडमेर (Barmer) जिल्ह्यातील उडाखा गावात ही घटना घडली आहे. काही लोक या घटनेला अंधश्रद्धा म्हणत आहेत, तर काहींनी या घटनेवर विश्वास ठेवलाय. मात्र घटने मागचं गुढ रहस्य काय आहे? हे अद्याप समोर आले नाही आहे.