नवी दिल्ली : देशभरात आज 29 मार्च रोजी होळी साजरी केली जात आहे. त्यातच आज हवामानात ही बदल पाहायला मिळाला. दिल्लीसह उत्तर भारतात उष्णता वाढल्याने लोकं हैराण झाले आहेत. डोंगराळ भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीच्या अनेक भागात तापमान 38 डिग्री सेल्सिअसच्या वर गेला आहे. आज दुपारी हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी झाली.
19 मार्च 2011 रोजी होळीच्याच दिवशी सर्वोच्च तापमान 35.4 डिग्री इतकी नोंदवली गेली होती. येत्या 7 दिवसात देखील अशीच उष्णता राहणार आहे.
Himachal Pradesh: Jungling village in Lahul-Spiti district received snowfall today. pic.twitter.com/9FVxIh3GIV
— ANI (@ANI) March 29, 2021
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारताच्या भागासाठी कोणताही इशारा दिला गेलेला नाही. परंतु आज जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नगालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा मध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.