Conversion Case : गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. या प्रकरणातील मुंब्रा येथील मुख्य आरोपी शहानवाजला याला पोलिसांनी अटक केली. गाझियाबदमध्ये उघडकीस आलेल्या ऑनलाईन गेम धर्मांतरण प्रकरणाचे आता थेट पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. आरोपी शाहनवाज याच्या मोबाईलमध्ये 30 पाकिस्तानी लोकांचे नंबर सापडल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.
धर्मांतरणाचे रॅकेट चालवणाऱ्या शाहनवाजचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचं तपासात समोर आले आहे. शाहनवाजच्या मोबाईल फोनमध्ये 30 पाकिस्तानी लोकांचे नंबर आढळून आले आहेत. सध्या शाहनवाझचा ताबा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांकडे आहे. मुंब्र्यातील रहिवासी असलेला शाहनवाझ हा सहा ई-मेल आयडी वापरत होता आणि त्यापैकी एकाच्या इनबॉक्समध्ये पाकिस्तानातून आलेले ई-मेल आढळल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पाकिस्तानी व्यक्तींच्या नंबरबाबत काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलीस शाहनवाझविरुद्ध कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याची शक्यता आहे.
गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये मुंब्रा भागात तब्बल 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला होता. झियाबादचे पोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांनी या माहितीची पुष्टी केली होती. 400 जणांच्या धर्मांतराची कोणतीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही असं स्पष्टीकरण मुंब्रा पोलिसांनी दिले होते. आपण केवळ गाझियाबाद पोलिसांना सहकार्य केलं असही मुंब्रा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगचा मास्टर माईंड शहनवाजला मुंब्रा पोलिसांनी अलिबागमधून अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
देशभर गाजत असलेल्या ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेसोरे ठाण्यातील मुंब्र्यात पोहोचले. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ चे पथक मुख्य आरोपी शाहनवाज खानच्या शोधासाठी मुंब्रा येथे दाखल झाले. मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून तो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेम मध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम काबुल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिश दाखवत होता.