मुंबई : आपण रस्त्यावरुन चालताना अशा बऱ्याच लोकांना पाहिलं असेल, जे मोबाईलवर बोलण्यात इतके व्यस्त असतात की, त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय याबद्दल भानच उतर नाही. अनेक लोक फोनवर बोलताचा रस्ता ओलांडतात, तर अनेक लोक गाडी चालवताना देखील आपल्या कानाला फोन लावतात. तर अशा अनेक महिला असतात, ज्या आपल्या मुलांना घेऊन बाहेर तर पडतात, परंतु त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. तुम्हाला देखील अशीच सवय असेल, तर सावध व्हा नाहीतर या महिलेसोबत जे घडलंय, ते तुमच्यासोबत देखील घडू शकतं.
एका विचित्र घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जो अंगावट काटा आणणारा आहे. यामध्ये एक महिला रेल्वे ट्रॅक जवळ येते, तेव्हा तिच्या अंगावरुन भरधाव ट्रेन जाते.
नशीबाने या महिलेला काहीही होत नाही. परंतु एवढं होऊनही तिला या घटनेचं काहीही गांभिर्य नसल्याचं पाहाला मिळतंय
हा व्हायर व्हिडीओ अर्ध्यावरुन सुरु होतोय, ज्यामध्ये फक्त ट्रेन जात असल्याचं दिसतं आणि ट्रेन गेल्यानंतर त्या ट्रॅकवर एक महिला झोपलेली दिलतेय. तिचं तोंड ओढणीनं झाकलं गेल्यामुळे त्या महिलेची ओळख पटलेली नाहीय. परंतु एवढं होऊन देखील ही महिला त्या रेल्वे ट्रॅकवरुन उठते आणि आपल्या फोनवर बोलू लागते की, जसं काही झालंच नाहीय.
ही महिला ट्रेनखाली कशी आल, तिच्यासोबत नक्की काय घडलं, हे कळू शकलेलं नाहीय, परंतु ती ज्यापद्धतीनं फोनवर बोलत राहिली, त्यामुळे ही महिला आधी देखील फोनवरच बोलत असल्यामुळे तिला ट्रेन आल्याचं कळलं नसावं असा अंदाज बांधला जात आहे.
परंतु या महिलेचं नशीब चांगलं होतं ज्यामुळे तिला काहीही झालेलं नाहीय.
फ़ोन पर gossip, ज़्यादा ज़रूरी है pic.twitter.com/H4ejmzyVak
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 12, 2022
तुम्हाला देखील रस्त्यावर अशी फोन वापरण्याची सवय असेल, तर हा व्हिडीओ पाहा आणि वेळीच सावध राहा.
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना 'फोनवर गॉसिप, अधिक महत्त्वाचं' असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 57 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.