10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या

10 Rupees Coin:  10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर? 

Pravin Dabholkar | Updated: Oct 5, 2024, 02:39 PM IST
10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या title=
10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात

10 Rupees Coin: आपल्या प्रत्येकाने चलनात असलेले दहा रुपयांचे नाणे नक्की पाहिले असेल. तुमच्यापैकी अनेकांच्या खिशात, पाकिटात आता 10 रुपयांचं नाणं असेल. पण हेच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर? हो. हे खरं आहे. काय आहे नक्की 10 रुपयाच्या नाण्याचं प्रकरणं? यामुळे ग्राहकांना तुरुंगात जाण्याची भीती का दाखवली जातेय? सविस्तर जाणून घेऊया. 

10 रुपयांच्या नाण्याच्या अनेक डिझाइन्स नकली असल्याच्या अफवा

10 रुपयांच्या नाण्याच्या अनेक डिझाइन्स नकली आहेत, अशी अफवा सोशल मीडियात पसरली आहे. 10 रुपयांचं नाणं स्वीकारलं जात नाही, अशीदेखील अफवा पसरवणयात आली आहे. या अफवेवर लोक विश्वास ठेवू लागले आहेत. त्यामुळे दुकानदारांपासून, मोठे व्यापारी, काही ठिकाणी बस कंडक्टरसुद्धा 10 रुपयांचं नाण घ्यायला मागत नाहीत. तसेच अनेकजण 10 रुपयांच नाण बाळगण्यास मागत नाहीत. 

 अनेक प्रकारे जागृकता केल्यानंतरही परिणाम नाही

अशा अफवांचे खंडन करण्यासाठी आरबीआयने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरबीआयच्या गाईडलाइन्सनंतर, परिवनह कर्मचाऱ्यांनी 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्याचे निर्देश  राज्य सरकारने दिले आहेत. अनेक प्रकारे जागृकता केल्यानंतरही याचा हवा तसा परिणाम पाहायला मिळाला नाही. त्यामुळे सर्वसाधारण जनतेमध्येदेखील याबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. 10 रुपयांचं नाण चलनात आहे पण ते स्वीकारण्यास कोणी तयार होत नाही. भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिलात तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, हेच अनेकांना माहिती नाही. 10 रुपयांचं नाण न स्वीकारणाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते? याबद्दल माहिती करुन घेऊया. 

10 रुपयांचं नाण का स्वीकारलं जात नाही? 

देशातील अनेक शहरांमधील दुकानदार 10 रुपयांचं नाणं स्वीकाले जात नाहीत. यामुळे सर्वसामांन्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 10 रुपयांचं नाण नकली आहे किंवा चलनात नाही, अशी अफवा पसरली आहे. पण असे करणे कायदेशीर गुन्हा आहे. 10 रुपयांचं नाण स्वीकारण्यास नकार दिलेल्यांची तुम्ही तक्रार करु शकता. या गुन्ह्यासाठी संबंधिताला शिक्षा होऊ शकते. 

भारतीय दंड संहिता काय सांगते? 

भारतीय दंड संहिताचे कलम 489 ए ते 489 ई नुसार नाण्यांची बोगस छपाई, नकली नोट किंवा नाण्याचे चलन किंवा नाणे स्वीकारण्यास मनाई करणे गुन्हा आहे. या कलमानुसार दंड आणि कारावस किंवा दोन्ही होऊ शकतं. कोणी तुमच्याकडून भारतीय चलन घेण्यास नकार देत असेल तर पुराव्यांसह तुम्ही त्याच्याविरोधात कारवाई करु शकता.नाणं स्वीकारण्यास मनाई करणाऱ्या व्यक्तीविरोधात तुम्ही गुन्हा दाखल करु शकता. त्यांच्याविरोधात भारतीय चलन अधिनियम आणि आयपीसीच्या कलमाअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेतदेखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यानंतर दुकानदार किंवा नाणं घेण्यास मनाई करणाऱ्याविरोधात कारवाई केली जाते.