येथे मिळतात ७५० रूपयात फक्त ४ पाणीपुरी !

 भारताची खाद्यसंस्कृती फारच संपन्न आहे.

Updated: Aug 17, 2017, 03:33 PM IST
येथे मिळतात ७५० रूपयात फक्त ४ पाणीपुरी !  title=

दिल्ली :  भारताची खाद्यसंस्कृती फारच संपन्न आहे.

त्यामुळे केवळ ताटातलं सात्त्विक अन्नच नव्हे तर गल्लोगल्ली मिळणार्‍या स्ट्रीट फूडची चवही कमाल असते. अशापैकीच एक पदार्थ म्हणजे पाणीपुरी !  

पाणीपुरी या नावानेच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण दिल्लीतील 'पुलम' हॉटेलमधील पाणीपुरीची किंमत ऐकून तुमच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे. कारण या हॉटेलामध्ये ७५० रूपयामध्ये फक्त ४ पाणीपुर्‍या विकल्या जातात.  

खरं तर ७५० रूपयांत तुम्ही महिनाभर अनेक प्रकारचे चाटचे पदार्थ रोज खाऊ शकाल. पण या इतक्या महागड्या पाणीपुरींमध्ये नेमके खास काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा यु ट्युब व्हिडिओ नक्की पहा.  

 

‘hmm!' या युट्युब चॅनलवर दिल्लीतील काही तरूणांनी  'पुलम' मध्ये मिळणारी पाणीपुरी कशी आहे ? त्यामध्ये नेमके कोण कोणते पदार्थ असतात याबाबतचे  गंमतीशीर तपशील दिले आहेत. मग पहा हा व्हिडिओ आणि तुम्हीच ठरवा ही ७५० रूपयांची खास पाणीपुरी तुम्ही खाणार का ?