PM मोदींनी बोलावलेल्या बैठकीत मोठा निर्णय, पुढील ६ महिने मिळत राहणार मोफत धान्य

PMGKAY योजनेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Mar 26, 2022, 07:00 PM IST
PM मोदींनी बोलावलेल्या बैठकीत मोठा निर्णय, पुढील ६ महिने मिळत राहणार मोफत धान्य title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. दुपारी साडेचार वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. सहसा अशा बैठका बुधवारी घेतल्या जातात, मात्र शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (PM Garib Anna Kalyan Yojana extended for next 6 months)

मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय मोदी मंत्रिमंडळात घेण्यात आला. ही योजना ३१ मार्च रोजी संपणार होती.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने ही योजना (PMGKAY) सुरू केली आहे. त्यासाठी शासनाने १ कोटी ७० लाखांची तरतूद केली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती ५ किलो दराने मोफत धान्य मिळत आहे.

शुक्रवारी जवळजवळ संपूर्ण मंत्रिमंडळ लखनऊमध्ये होते. कारण उत्तर प्रदेशमध्ये नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होणार होती. अशा परिस्थितीत तेथून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पीएम मोदींनी ही बैठक बोलावली.