प्रेमाचा 'ताप' भोवला! महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला, दररोज आजारी पडू लागला, शेवटी...

रुग्णालायात तपासणीसाठी गेलेला रुग्ण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला आणि दररोज रुग्णालयाच्या चकरा मारू लागला, शेवटी त्या तरुणाला... 

Updated: Nov 21, 2022, 06:56 PM IST
प्रेमाचा 'ताप' भोवला! महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला, दररोज आजारी पडू लागला, शेवटी...  title=
प्रतिकात्मक फोटो

Trending News : एकतर्फी प्रेमाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या एका रुग्णाला तिथल्या ज्युनिअर डॉक्टरशी प्रेम जडलं. मग काय तिला बघण्यासाठी तो तरुण दररोज आजारी पडू लागला. आजारपणाचे कोणते ना कोणते बहाणे करत तो रुग्णालयात जाऊ लागला. तब्बल 15 दिवस हा प्रकार सुरु होता. शेवटी त्या डॉक्टरला संशय आला. तीने याबाबतची माहिती आपल्या सिनिअर डॉक्टर्सना दिली. शेवटी रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी त्या पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं.

तरुणाने केली सारवासारव
अचक केल्यानंतर तरुणाने आपण औषधं घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. कानपूरमधल्या जाजमऊ इथं रहाणारा तौहीद काही दिवसांपूर्वी आजारी पडला होता. उपचारासाठी तो रुग्णालयात गेला. त्यावेळी एक ज्युनिअर महिला डॉक्टर रुग्णांची तपासणी करत होती. त्या डॉक्टरने तौहीदचीही तपासणी करत त्याला औषधं दिली.

पहिल्याच भेटीत प्रेमात पडला
पहिल्याच भेटीत तौहित त्या महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. त्यानंतर तिला बघण्यासाठी तो दररोज आजारपणाची काही ना काही कारणं काढत रुग्णालयात गाठू लागला. काही वेळा तर वेगवेगळ्या नावाने तो रुग्णालयाची रिसीट बनवत असे. रुग्णालयात ती महिला डॉक्टर दिसली नाही की तौहिद इतर डॉक्टरांकडे तिच्याबद्दल चौकशी करत असे. 

हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांची चोपलं
काही दिवसांनी ही गोष्ट त्या महिला डॉक्टरच्या लक्षात आली. हा तरुण दररोज काहीही आजर नसताना रुग्णालयात येत असल्याची माहिती तिने आपल्या सिनिअर डॉक्टर्सना दिली. शनिवारी तौहित पुन्हा रिसीट काढून ओपीडीत पोहोचला. त्यावेळी आधीच सतर्क असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि तौहितला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर तौहित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तौहिदला न्यायालयात हजर करण्यात आलं, सुरुवातीला त्याने आपण केवळ औषधं घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं, नंतर आपला गुन्हा कबूल करत त्याने पुन्हा आपण असे प्रकार करणार नसल्याचं सांगत माफी मागितली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने तौहिदला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.