नवी दिल्ली : अनेकवेळा पासपोर्ट काढण्यासाठी कटकटी सहन कराव्या लागतात. मात्र, यात सुटसुटीतपणा येत आहे. तसेच पासपोर्ट काढला आणि त्यात काही त्रुटी राहील्या तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता यातून सुटका होणार आहे. कारण आता पासपोर्ट दुरस्ती ऑनलाईन करता येणार आहे.
पासपोर्टमध्ये तुम्हाला काही करेक्शन करायचे असेल तर आता अधिक सोपे झाले आहे. सरकारने पासपोर्ट दुरूस्तीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे. ऑनलाईन अर्ज करून तुम्ही तुमचे नाव, पत्ता, वैवाहिक स्थिती, जन्म तारीख यामध्ये बदल करू शकता.
दरम्यान, पासपोर्टमध्ये तुम्हाला काही दुरूस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. जर तुम्ही याआधी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला फक्त या लिंकवर लॉग इन करावे लागेल.
लॉग इन केल्यानंतर रि-इश्यू पासपोर्टवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. फॉर्ममध्ये नाव, जन्म तारीख, पत्ता, रि – इश्यूचे कारण यावर क्लिक करा. हा फॉर्म तुमच्या लॉग इनवर अपलोड करावा लागेल.
फॉर्म अपलोड केल्यानंतर तुम्हाला जवळच्या विभागीय पासपोर्ट ऑफिसची ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.ठरलेल्या वेळी विभागीय पासपोर्ट कार्यालयात सत्य प्रतींसह या कागदपत्रांच्या फाटोकॉफींसह भेट द्या.
येथील अधिकारी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतील आणि ऑनलाईन अपलोड करतील. त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट फीस भरावी लागेल. त्यानंतर फायनल पोलीस व्हेरिफिकेशनंतर पोस्टाद्वारे तुम्हाला तुमचा पासपोर्ट तुमच्या घरच्या पत्यावर येईल.