पॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासा

Central Drugs Standard Control Organization: पॅरासीटामोल घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन औषधांची एक यादी काढली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 26, 2024, 09:59 AM IST
पॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासा title=
Over 50 medicines including paracetamol diabetes hypertension vitamins fail in quality tests

Central Drugs Standard Control Organization: पॅरासीटामोल ही अशी गोळी आहे जी प्रत्येकाच्या घराघरात उपलब्ध असते. ताप आल्यावर अनेकदा लोक एक पॅरासीटामोलची गोळी घेतात. मेडिकलच्या प्रस्क्रिप्शनशिवाय ही गोळी घेतली जाते. तुम्हीदेखील असं करत असाल तर सतर्क होण्याची गरज आहे. भारतच्या औषध नियमक संस्थेने 53 औषधांची यादी जाहिर केली आहे. जी दर्जा तपासणीत अपयशी ठरली आहे. यात प्रतिजैविके, पॅरासिटामॉल, मधुमेहासह रक्तदाबावरीलही औषधे आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या सर्वात मोठ्या औषध नियामक संस्थेने ही यादी जाहीर केली आहे. 

औषध नियामक संस्थेने जाहीर केलेल्या यादीत कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 सप्लीमेंट , मधुमेहाच्या गोळ्या व रक्तदाबाच्या औषधांचाही समावेश आहे. गुणवत्ता परीक्षणात फेल झालेल्या औषधांची यादी  सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) त्यांच्या ऑफिशिअल वेबसाइटवर अपलोड केली आहे. 

भारतच्या औषध नियमक संस्था काही प्रत्येक महिन्यात काही औषधांची तपासणी करतात. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या रँडम सँपलिंगमध्ये यंदा व्हिटॅमिन सी आणि डी 3च्या टॅबलेट्स शेकल्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटीअॅसिड पॅन डी, पॅरासीटामोल आयपी 500 एमजी, मधुमेहाचे औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाबाचे औषध टेल्मिसर्टन सारख्या औषधांची निवड करण्यात आली होती. मात्र, दजा तपासणी चाचणीत ही औषध फेल ठरली आहेत. 

ड्रग कंटोलरने क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेल्या औषधांची यादी जाहीर केली आहे. यातील एका लिस्टमध्ये 48 औषधांची नावे असून दुसऱ्या लिस्टमध्ये पाच औषधांची नावं व औषध कंपन्यांचे उत्तरदेखील दिले आहे. औषध कंपन्यांनी याची जबाबदारी घेण्यास नकार दिला असून त्या औषधांना बनावट असल्याचे म्हटलं आहे. मात्र, ही औषधं बनावट आहेत ती नाही याची चौकशी सुरू आहे. 

ऑगस्ट महिन्यातही, सीडीएससीओने 156 पेक्षा जास्त फिक्स्ड-डोज ड्रग कॉम्बिनेशन्स धोकादायक मानून त्यावर बंदी घातली होती. या औषधांमध्ये ताप, वेदना कमी करणाऱ्या आणि अॅलर्जीच्या गोळ्यांचा समावेश होता.