मुंबई : अनेकदा परीक्षा रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आज अखेर 'NEET'ची परीक्षा होत आहे. देशभरातील जवळपास १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी NEETच्या परीक्षेस बसले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून दिल्लीमध्ये सकाळी ६ वाजेपासून मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्रेनने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेने सांगितंल आहे.
दरम्यान देशात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत ३ हजार ८४३ परीक्षा केंद्राच्या व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर प्रत्येक वर्गामध्ये फक्त १२ विद्यार्थांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
परीक्षे दरम्यान विद्यार्थांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
- परीक्षा झाल्यानंतर सामाजिक अंतर कायम रहावे यासाठी प्रवेश व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
- परीक्षा केंद्रा बाहेर आणि परीक्षा हॉलमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असणार आहे.
- परीक्षा हॉलमध्ये मास्क घालणे विद्यार्थांसाठी बंधनकारक असणार आहे.
- विद्यार्थांना परीक्षा हॉलमध्ये मोबाइल फोन, हँडबॅग, पर्स, कोणत्याही प्रकारचे कागद, स्टेशनरी, खाद्यपदार्थ, कॅल्क्युलेटर, कॅमेरा, टेप रेकॉर्डर, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, पेन्सिल बॉक्स, कोणत्याही प्रकारचे गॅझेट ठेवण्याची परवानगी नाही.