National Highways Authority of India: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने देशातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे. खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार आहे. याबद्दल प्राधिकरणाने प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत सहभागी असलेल्या एनएचएआयच्या प्रतिनिधींच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली आहे.
NHAI ने जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. "रोड मार्किंग, रोड साइनेज, पंच लिस्टमध्ये क्रॅश बॅरिअर्स यांसारखी सुरक्षा कामे ठेऊन प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे निदर्शनास आलं आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड तर होतेच त्याव्यतिरिक्त अपघात देखील होतात आणि NHAI चं सुद्धा खराबं होतं" हे माहिती असायला हवं की, प्रलंबित कामांना एका नावाच्या श्रेणीत ठेवलं जातं ज्याला पंच लिस्ट असं म्हणतात. असं या परिपत्रकात म्हटलं आहे.
"प्रमाणपत्र देण्यापूर्वी रस्ते सुरक्षेशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाली आहेत याची खात्री करावी. निकृष्ट रस्ते अभियांत्रिकी कामांमुळे कोणताही जीवघेणा रस्ता अपघात झाल्यास, प्रादेशिक अधिकारी, प्रकल्प संचालक, स्वतंत्र अभियंता जबाबदार असतील". असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटलं आहे.
रस्ता सुरक्षेशी संबंधित नसलेल्या कामांचाच पंच लिस्टमध्ये समावेश करावा, असं प्राधिकरणाने म्हटलं आहे. या यादीतील कामे ३० दिवसांत पूर्ण करावीत. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते की, सल्लागाराने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालातील (DPR) चुका हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहेत. ते म्हणाले की, डीपीआर तयार करताना अधिक काळजी आणि अनेकविध बदलांची गरज आहे.