नवी दिल्ली : २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा ७ टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका या ९ टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या. ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे या ७ टप्प्यांमध्ये देशभरात निवडणुका होतील. तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरवरून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 'सबका साथ सबका विकास, पुन्हा एकदा एनडीएला आशिर्वाद द्या. मागच्या ७० वर्षांमध्ये पूर्ण न झालेल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही मागची ५ वर्ष काम केलं. आता यापुढे मजबूत, समृद्ध आणि सुरक्षित भारत बनवण्याची वेळ आली आहे. #फिरएकबारमोदीसरकार ', असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
Guided by ‘Sabka Saath, Sabka Vikas’, NDA seeks your blessings again.
We spent the last five years fulfilling basic necessities that were left unfulfilled for 70 long years. Now, time has come to build on that and create a strong, prosperous & secure India. #PhirEkBaarModiSarkar— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2019
लोकसभा निवडणुकीच्या ७ टप्प्यांपैकी पहिल्या ४ टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ जागांसाठीचं मतदान होईल. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होईल.