Kanpur Shocking Death Case: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक धक्कादायक घडना उघड झाली आहे. रावतपूरच्यूया कृष्णपुरीमध्ये एका कुटुंबाने दीड वर्षे प्राप्तिकर अधिकाऱ्याचा मृतदेह (IT Officer dead body) घरात ठेवला होता. कसून आणि सखोल चौकशी केल्यानंतर शुक्रवारी आयकर विभागाचे लोक तपासणीसाठी आले असता घरातच मृतदेह पडून असल्याचे उघड झाले. (Crime News)
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एका खासगी रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी तो कोमात गेला आहे, जिवंत आहे, असे समजून त्याचा मृतदेह इतके दिवस घरात ठेवला होता. विमलेश दीक्षित असे मृताचे नाव असून तो प्राप्तिकर विभागात कार्यरत होता. कानपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. आलोक रंजन म्हणाले, "विमलेश दीक्षित यांचे गेल्यावर्षी 22 एप्रिल रोजी निधन झाले, परंतु दीक्षित कोमात गेल्याचा विश्वास असल्याने कुटुंबीय अंतिम संस्कार करण्यास नकार दिला आणि शव घरातच ठेवले होते.
याबाबत कानपूरच्या आयकर अधिकार्यांनी माहिती दिली की, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची विनंती केली होती. मुख्य वैद्यकीय अधिकारी सांगितले की, जेव्हा वैद्यकीय पथक त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबीय विमलेश जिवंत आणि कोमात असल्याचा आग्रह धरत होते. खूप समजावून सांगितल्यानंतर, कुटुंबीयांनी आरोग्य विभागाच्या टीमला मृतदेह लाला लजपत राय (LLR) रुग्णालयात नेण्यास परवानगी दिली. जिथे वैद्यकीय तपासणी केली आणि ही व्यक्ती मृत असल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि लवकरात लवकर अहवाल देण्यासाठी डॉ. एपी गौतम, डॉ. आसिफ आणि डॉ. अविनाश यांची तीन सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही बातमी शहरात सर्वत्र पसरली. त्यानंतर शेजारीच नाही तर ज्यांना ही बातमी कळली तेही चक्रावून गेले. ही बाब कोणालाच का कळली नाही, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. दीड वर्ष मृतदेह घरात कसा राहिला? तो का सडला नाही? कुटुंबाने हे कसे केले? मृतदेहासोबत कुटुंबीय तेथे कसे राहत होते, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, विमलेशची पत्नी रोज सकाळी अंगावर 'गंगाजल' शिंपडायची. कारण असे केल्याने तिला 'कोमा'तून बाहेर काढण्यास मदत होईल, अशी आशा वाटत होती. शेजाऱ्यांनाही विमलेश आजारी असल्याचे सांगण्यात आले. शेजाऱ्यांपैकी एकाने पोलिसांना सांगितले, 'कुटुंबातील सदस्य अनेकदा ऑक्सिजन सिलिंडर घरी घेऊन जाताना दिसले.'
एका अधिकाऱ्याने सांगितले की, दीक्षित यांची पत्नी मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, कानपूर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, खासगी रुग्णालयाने मृत्यू प्रमाणपत्रात म्हटले आहे की, विमलेश दीक्षित यांचा मृत्यू 22 एप्रिल 2021 रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांचा मृतदेह पूर्णपणे कुजल्याचे पोलिसांनी सांगितले.