नवी दिल्ली : हैदराबादच्या महिंद्रा इकोल सेंट्रल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (एमईसी) तीन पदवीधरांना जपानच्या दोन कंपन्यांकडून भरघोस पॅकेज मिळालंय. ग्राऊंड इंक आणि फोरम या दोन कंपन्यांकडन ८ ते ३० लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालंय. संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, कम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगच्या दोन पदवीधर विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ३० लाख रुपये वार्षिक पॅकेजची ऑफर देण्यात आलीय. तर मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला 'फोरम'कडून ८ ते ३० लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाच्या पॅकेजचा प्रस्ताव मिळालाय.
याशिवाय, इंजिनिअरिंग कॉलेजच्या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला मायक्रोसॉफ्टनंही नोकरीचा प्रस्ताव दिला.
संस्थेच्या पहिल्याच बॅचला आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून जो प्रतिसाद मिळालाय त्यामुळे संस्थेला आनंद झालाय, असं महिंद्र इकोल सेंट्रलचे संचालक डॉ. यजुला मेदुरी यांनी म्हटलंय.
'ग्राऊंड इंक' या कंपनीनं कम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगच्या गाडी रेड्डी करुणाकर आणि अन्नापुरेड्डी रविनितेश रेड्डी यांना प्रत्येकी ३० लाकांच्या सर्वाधिक सॅलरी पॅकेजची ऑफर दिलीय. तर 'फोरम'नं मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या नितीन दिनेश चौधरी या विद्यार्थ्याला ३० लाखांच्या पॅकेजची ऑफर दिलीय.
महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्युटशन्सनं भारतात 'एमईसी'च्या स्थापनेसाठी इकोल सेंट्रल पॅरिसशी करार केलाय. एमईसीला एआयसीटीई आणि जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (जेएनटीयू) हैदराबादची मान्यता मिळालीय.