आता या गोष्टीसाठीही आधार अनिवार्य

बॅंक खाती आणि मोबाईल नंबरसोबत वेगवेगळ्या सरकारी योजनांना आधर बंधनकारक केल्यानंतर आता विमा पॉलिसीसाठीही ते अनिवार्य करण्यात आलंय.

Updated: Nov 9, 2017, 03:16 PM IST
आता या गोष्टीसाठीही आधार अनिवार्य title=

नवी दिल्ली : बॅंक खाती आणि मोबाईल नंबरसोबत वेगवेगळ्या सरकारी योजनांना आधर बंधनकारक केल्यानंतर आता विमा पॉलिसीसाठीही ते अनिवार्य करण्यात आलंय.

आयआरडीएने बुधवारी विमा पॉलिसीला आधार लिंक करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तर आयआरडीएने सर्व विमा कंपन्यांना या संवैधानिक नियमाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. 

आयआरडीएने एलआयसीसहीत सर्वच विमा पॉलिसी आणि साधरण विमा कंपन्यांना ही सूचना पाठवली आहे. या नियमामुळे अनेक विमा कंपन्यांसमोर अडचणी उभ्या राहण्याची मोठी शक्यता आहे. आयआरडीएने जारी केलेल्या आदेशानुसार असे होईल की, कंपनी पेमेंट करण्याआधी पॉलिसीहोल्डर्सना आधार आणि पॅन नंबर जमा करण्यास सांगेल. आणि असे न केल्यास पैशांची प्रोसेस रोखली जाईल. 

विमा कंपन्यांना जारी नोटीसमध्ये म्हटले आहे की, हा नियम जीवन विमा आणि इतर विम्यांसाठी लवकरात लवकर लागू करावा. अनेक विमा कंपन्या पॉलिसीसाठी आधीच पॅन नंबर मागतात. पण याची गरज ५० हजार रूपयांपेक्षा जास्त कॅश प्रिमियमसाठी असते.