Pamban Railway Bridge: भारतीय रेल्वे लवकरच एक नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये 2,070 मीटर लांबीचा वर्टिकल लिफ्रट सी ब्रिज (पंबन ब्रिज) आता अंतिम टप्प्यात आहे. सध्याच्या पांबन पुलाला समांतर बांधण्यात येणारा हा पूल भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज असेल. यात समुद्रात 100 स्पॅन टाकले असून त्यात 99 स्पॅन 18-3 मीटर आणि एक स्पॅन 72-5 मीटर मापाचे आहेत. या प्रकल्पावर 550 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील जलवाहिनीवर लिफ्ट स्पॅन गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, ३१ ऑगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र अद्यापही काम अंतिम टप्प्यात आहे. मजबुतीकरणाचे काम केल्यानंतर शंभर वर्षे जुन्या पांबन रेल्वे पुलावर लाईट इंजिनची चाचणी घेण्यात आली. मजबुतीकरणाच्या कामासाठी १५ जुलैपासून पुलावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.
सर्व उप-संरचना (333 पाईल्स आणि 101 पाइल कॅप्स) पूर्ण झाल्या आहेत. ९९ अप्रोच गर्डर्स तयार करण्यात आले असून त्यापैकी ७६ सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित 23 स्पॅन पांबनच्या टोकापासून सुरू केले जात आहेत. लिफ्ट स्पॅन तयार करण्यात आला आहे, 26 जुलै 2024 रोजी 428 मीटर पैकी 200 मीटर यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आला. मंडपमच्या टोकापासून 1-50 किमीपर्यंतचा ट्रॅक जोडला गेला आहे. माल गाड्यांची चाचणी पूर्ण झाली असून 0-60 किमी काम अपूर्ण आहे.
दक्षिण रेल्वेने 12 जुलै 2024 रोजी नवीन पांबन पुलावर लाइट इंजिन चाचणी घेतली होती. ज्यात पुलाची संरचनात्मक अखंडता आणि विश्वासार्हता याची पुष्टी करण्यात आली होती. 4 ऑगस्ट, 2024 रोजी टॉवर कार चाचणीसह, एक OHE (ओव्हरहेड इक्विपमेंट) टॉवर पुलावरून रामेश्वरम स्थानकापर्यंत चालवण्यात आली होती. 2024 च्या अखेरीस हा पूल पूर्ण होऊन रेल्वे वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित होते मात्र अद्याप काही किरकोळ कामे बाकी आहेत.
पूर्वीच्या काळात बांधण्यात आलेल्या उत्कृष्ट बांधकामापैकी एक म्हणून ओळखला जाणारा, ग्रेट पांबन कॅन्टीलिव्हर ब्रिज 1914 मध्ये कार्यान्वित झाला होता. द्वीपकल्पीय भारत आणि मन्नारच्या आखाताला जोडणारी ही जुनी रचना रामेश्वरमच्या रामेश्वरम बेटाशी जोडते. तामिळनाडू राज्यातील हा पूल दक्षिण रेल्वेच्या मदुराई विभागाच्या अखत्यारीत येतो.
या रेल्वे पुलाची एकुण लांबी 2.07 किमी असेल तसंच, रामेश्वरमला भेट देणास उत्सुक असलेल्या भक्तांसाठी हा पुल वरदान ठरेल. रामेश्वरमसह धनुष्कोडीला जाणारे प्रवासीही या पुलाचा वापर करतील आणि काही मिनिटांत तासांचा प्रवास पूर्ण होईल. नवीन पूल सुरू झाल्यानंतर जुना पूल बंद करण्यात येणार आहे.