रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली; अन्यथा सीट मिळणार नाही

रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेन ऑनलाईन तिकीट बुक करण्याची पद्धत बदलली आहे.

Updated: Jul 28, 2022, 01:15 PM IST
रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली; अन्यथा सीट मिळणार नाही title=

Indian Railways Ticket Booking Rules: रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेन ऑनलाईन तिकीट बुक करण्याची पद्धत बदलली आहे. आयआरसीटीसीने अ‍ॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट बुकींच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार तिकीट बुकिंगसाठी अकाउंट व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. युजर्संना तिकीट बुक करण्यासाटी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. ईमेड आयडी आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनशिवाय ऑनलाईन तिकीट बुक करता येणार नाही. 

नविन नियम करण्यामागचं कारण
आयआरसीटीसीच्या खात्यावर कोरोना काळात खूप सारे युजर्स झाले आहेत. पण त्यांनी आतापर्यंत ऑनलाईन तिकीट बुक केलेलं नाही. हा नियम फक्त दीर्घ काळापासून कोणतंही तिकीट बुक केलं नाही, अशा लोकांसाठी आहे. 

असं करा व्हेरिफिकेशन

  • आयआरसीटीसीच्या अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जा आणि व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा
  • तिथे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नमूद करा.
  • दोन्ही बाबी नमूद केल्यानंतर व्हेरिफाय बटणावर क्लिक करा
  • व्हेरिफाय क्लिक केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल. तो तिथे दिलेल्या चौकोनात नमूद करा
  • याच पद्धतीने ईमेलवर आलेला कोडही नमूद करा. त्यानंतर व्हेरिफाय करा.
  • आता तुम्ही कोणत्याही ट्रेनचं तिकीट बुक करू शकता.

एका खात्यावरून 24 तिकीट बुक करता येणार
आयआरसीटीसीचा युजर्स एका महिन्यात जास्तीत जास्त 24 तिकीट बुक करु शकतो. आधार लिंक असलेल्या युजर्स 24 तिकीट बुक करू शकता.