लेहमध्ये सापडले तब्बल 175 भूसुरुंग, लष्कराकडून नष्ट; पण ते लावले कुणी?

Leh Ladakh : देशाच्या अतील उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर प्रांतामध्ये सातत्यानं काही लष्करी कारवाया सुरु असल्याचं पाहायला मिळतं. 

सायली पाटील | Updated: Oct 13, 2023, 11:58 AM IST
लेहमध्ये सापडले तब्बल 175 भूसुरुंग, लष्कराकडून नष्ट; पण ते लावले कुणी? title=
indian army destroyed 175 mines in leh latest india news

Jammu Kashmir News : दशतवादाचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमधील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणाऱ्या भारतीय लष्करानं काही दिवसांपूर्वीच दीर्घ काळासाठी चाललेल्या मोहिमेत तीन दहशवाद्यांचा खात्मा केला. साधारण चार दिवसांहून अधिक काळासाठी ही मोहिम चालली जिथं लष्करानं खोऱ्यातील प्रांतात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ज्यामागोमाग आता लष्करानं लेह (Leh Ladakh) इथं एक अतिशय महत्त्वाची मोहिम यशस्वीरित्या पार पाडली. 

लष्कराच्या या मोहिमेअंतर्गत तब्बल 175 भूसुरुंग निकामी करण्यात आले. लेह जिल्ह्यातील तीन भागांमध्ये लष्कराची ही मोहिम पार पडली. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आणि बीएसएनएलनं त्यांचा तळ या भागात सुरु केल्यानंतर लष्करानं ही कारवाई केली. 

'फोबरँग, योरगो आणि लुकूंग गावातील नागरितांच्या वतीनं लष्करानं या भागातील लँडमाईन निष्क्रीय केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो', अशी प्रतिक्रिया या मोहिमेनंतर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिक गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रस्न आणि त्यांचं संरक्षण दलाशी असणारं नातं आणखी सुधारण्यामध्येही या मोहिमेनं हातभार लावण्याची बाब अधोरेखित करण्यात आली. 

हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल

 

लेहमधील ज्या गावांमधील क्षेत्रांमध्ये भूसुरुंग पेरण्यात आले होते ते साधारण 1962 दरम्यानचे असल्याचं सांगण्यात आलं. अनेकदा स्थानिकांची या भागांमध्ये ये-जा असते ज्यामुळं या भूसुरुंगांचा स्फोटही होण्याची भीती असते. ज्यासाठी गेल्या बऱ्याच काळापासून स्थानिकांनी लष्कराकडे इथं सुरूंग निकामी करण्याची विनवणी केली होती. दरम्यान लेह प्रांतातील गावांमध्ये हे भूसुरुंग दहशतवादी संघटना किंवा लष्करी कारवाईदरम्यान शत्रू राष्ट्रानं पेरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवाय नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.