भारतीय नौदलाच्या 'एअर शो'दरम्यान 5 जणांचा Heart Attack नं मृत्यू; 16 लाखांच्या गर्दीची उन्हामुळं होरपळ

indian air force airshow 2024 : प्रशासन आणि आयोजनामध्ये असणाऱ्या त्रुटींमुळं ओढावलं संकट. जीवघेण्या प्रसंगी नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त... 

सायली पाटील | Updated: Oct 7, 2024, 09:21 AM IST
भारतीय नौदलाच्या 'एअर शो'दरम्यान 5 जणांचा Heart Attack नं मृत्यू; 16 लाखांच्या गर्दीची उन्हामुळं होरपळ title=
indian air force airshow 2024 Five persons die due to heatstroke on the marina beach

indian air force airshow 2024 : भारतीय नौदराच्या वतीनं तामिनाळनाडूतील (Tamilnadu) चेन्नई (Chennai) इथं रविवारी एका एअर शोचं आयोजन केलं होतं. भारतीय नौदलाच्या 92 व्या वर्षपूर्तीनिमित्त (Marina Beach) मरिना किनाऱ्यावरील क्षेत्रामध्ये या एअर शोचं आयोजन करण्यात आलं. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी इथं लाखोंच्या संख्येनं गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. साधारण 15 ते 16 लाखांचा जमाव इथं लोटला आणि वाढतं तापमान, शरीरातील पाण्याची अचानक घटलेली पातळी या आणि अशा अनेक गंभीर कारणांनी इथं आलेल्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली, तर पाच जणांचा हृदयविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

रविवारी सकाळपासूनच मरिना समुद्रकिनाऱ्याच्या दिशेनं शेकडोंनी लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. रेल्वे, मेट्रो, स्थानिक परिवहन मंडळाच्या बस इथपासून ते खासगी वाहनांनी याच दिशेनं जाण्यासाठी रस्त्यांवरही गर्दी केल्यामुळं वाहतूक कोंडीच्या समस्येनंही अनेकांनाच भांडावून सोडलं. मरिना किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाहन तळांपासून इथं आलेल्यांना बरीच पायपीटगी कराली लागली. 

दरम्यान, यंत्रणांनी सूचना केल्यानुसार काही मंडळी इथं सोबत पाण्याच्या बाटल्या, छत्र्या आणि टोप्या घेऊन येतानाही दिसले. पण, या गर्दीत हजारोंच्या संख्येनं आलेले प्रेक्षक मात्र कोणत्याही तयारीशिवाय इथं पोहोचले होते. तिथं आभाळात हळुहळू वायुदलाची विमानं येण्यास सुरुवात झाली, कार्यक्रम पुढे गेला, प्रत्यक्षिकं आणखी थरारक ठरत होती. पण, इथं बघ्यांच्या गर्दीमध्ये मात्र परिस्थितीला भीषण वळण मिळालं होतं.

हेसुद्धा वाचा : 8 ऑक्टोबरला जाहीर होणार MHADA Lottery; पण कधी मिळणार घरांचं पजेशन? पाहा महत्त्वाची Update

मरिना समुद्र किनाऱ्यावर वायुदलाची प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी पोहोचलेल्यांपैकी पाच जणांना भोवळ येऊन ते तिथं पडले आणि त्यांचा तिथंच मृत्यू ओढावला. कार्यक्रमानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये घडलेल्या या सर्व प्रकारानंतर भाजप नेते अन्नामलाई यांनी डीएमके सरकारवर निशाणा साधला. 

सूत्रांच्या माहितीनुसार वाहतूक पोलिसांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्यामुळं इतकं मोठं संकट ओढावल्याची बाब आता समोर येत आहे. एकट्या रविवारी चेन्नईमध्ये वाहतुक मार्गांवर अनेजण अडकून पडलेतर, मरिना समुद्रकिनारी असणाऱ्या गर्दीनं सर्वांनाच धडकी भरवली.