पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर १.२३ रुपयांनी तर डिझेल ८९ पैशांनी महाग झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2017, 11:06 PM IST
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर १.२३ रुपयांनी तर डिझेल ८९ पैशांनी महाग झाले आहे.

दररोज चढ-उतार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असतानाच आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारला पाठवलेला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दराचा आणि रूपया आणि डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेऊन हे दर निश्चित केले जातात.