सुप्रसिद्ध लेखक कांचा इलैया यांना जीभ कापण्याची धमकी

सुप्रसिद्ध लेखक आणि बुद्धिजीवी वर्तुळातील मोठे नाव असलेल्या डॉ. कांचा इलैया यांना जीभ कापण्याची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या धमकीबाबत इलैया यांनी हैदराबाद येथील ओस्मानिया युनिवर्सिटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 11, 2017, 06:02 PM IST
सुप्रसिद्ध लेखक कांचा इलैया यांना जीभ कापण्याची धमकी title=

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध लेखक आणि बुद्धिजीवी वर्तुळातील मोठे नाव असलेल्या डॉ. कांचा इलैया यांना जीभ कापण्याची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या धमकीबाबत इलैया यांनी हैदराबाद येथील ओस्मानिया युनिवर्सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत इलैय्या यांनी, आपल्याला रविवारपासून धमकी देणारे फोन सतत येत आहेत. फोन उचलताच समोरून धमकी येत आहे. शिवीगाळ आणि असभ्य भाषा वापरली जात आहे, असे म्हटले आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, इलैया यांनी एक पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकात वैश्य समाजातील लोकांचा 'सामाजिक तस्कर' असा उल्लेख केल्यानंतर इलैया यांना जोरदार विरोध होत होता. इलैया यांना आलेल्या धमकीचा या प्रकरणाशी संबंध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

काय म्हटले आहे पोलीस तक्रारीत?
इलैया यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, '१० सप्टेबर पासून मला अज्ञात लोकांकडून सातत्याने धमकीचे फोन येत आहेत. जेव्हा जेव्हा मी फोन स्विकारतो तेव्हा मझ्याशी अर्वाच्च भाषेत बोलले जाते. रामकृष्ण यांच्या नेत्वृत्वाखालची संघटना आर्य-वैश्य संगम टीव्हीवरूनही माझी निंदा केली जाते. संध्याकाळी टीव्ही ९ वर रमाना यांनी मला जीभ कापण्याची धमकी दिली.