HDFC बँकेतील ग्राहकांसाठी Alert! UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच

ऑनलाइन ट्रांजेशन आता सर्रास UPI वापरलं जातं. पण HDFC च्या ग्राहकांसाठी UPI संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. या दिवशी बँकेचं UPI बंद असणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 6, 2025, 12:26 PM IST
HDFC बँकेतील ग्राहकांसाठी Alert! UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच title=

HDFC च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. UPI चा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हा सर्वात मोठा Alert आहे. HDFC एका विशिष्ट तारखेला आपली UPI सेवा बंद करणार आहे. या दिवशी UPI वरुन कोणतीही सेवा पुरवली जाणार नाही. HDFC च्या ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाचं म्हणजे काही कालावधीसाठी UPI वापरता येणार नाही. याबाबत सविस्तर माहिती खाली दिली गेली आहे. 

एचडीएफसी बँकेच्या सेवा विस्कळीत राहतील

एचडीएफसी बँकेने त्यांच्या वेबसाइटवर माहिती दिली आहे की, त्यांच्या यूपीआय सेवा 8 फेब्रुवारी रोजी 3 तासांसाठी विस्कळीत राहतील. 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 12.00 ते पहाटे 3.00 वाजेपर्यंत, HDFC बँकेचे चालू आणि बचत खाते, RuPay क्रेडिट कार्ड, HDFC मोबाइल बँकिंग ऍप आणि UPI साठी HDFC बँकेद्वारे समर्थित तृतीय पक्ष ऍप्सवर UPI व्यवहार शक्य होणार नाहीत. याशिवाय, एचडीएफसी बँकेमार्फत कोणताही व्यापारी यूपीआय व्यवहार शक्य होणार नाही.

कारण काय?

एचडीएफसी बँकेने UPI बाबत होणाऱ्या या अपडेटचे कारणही ग्राहकांना सांगितले आहे. बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी सिस्टम मेंटेनन्स केले जात असल्याची माहिती बँकेने दिली आहे. यामुळे ग्राहकांना काही तासांसाठी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. गैरसोय टाळण्यासाठी, ग्राहक त्यांचे महत्त्वाचे काम आधी पूर्ण करू शकतात किंवा एटीएममधून पैसे काढू शकतात.

डिजिटल व्यवहारांमध्ये UPI चा वाटा जास्त

देशातील एकूण डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, 2019 मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये यूपीआयचा वाटा 34 टक्के होता, जो आता दुप्पट होऊन 83 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच देशातील 83 टक्के डिजिटल पेमेंट UPI द्वारे केले जातात. उर्वरित 17 टक्के व्यवहारांमध्ये एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेले सर्व व्यवहार समाविष्ट आहेत.