नवरीला सोडून करवलीशीच लग्न? Video होतोय Viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 18, 2022, 02:35 PM IST
नवरीला सोडून करवलीशीच लग्न? Video होतोय Viral  title=

मुंबई : लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती, नाच गाणी सगळं काही येतं. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी नवरदेव आणि नवरी हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. काही लोकं या सोहळ्यातील सुंदर, आनंदी आणि मजेदार क्षणं सोशल मीडियावर देखील शेअर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नवरदेवानं चक्क शेवटच्या क्षणी नवरीबदलली. (Viral Video) 

आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मंगलाष्टकाच्या विधीत नवरोबांच्या मनाची चलबिचल होऊ लागते. नवरीपेक्षा तिच्या शेजार असलेली तिची करवलीच जास्त आवडल्यानं आता नक्की कोणाच्या गळ्यात हार घालून लग्न करावं असा नवऱ्याचा गोंधळ होतो. नवरदेवानं चक्क नवरी ऐवजी करवलीच्या गळ्यात हार घातलाय. त्यानंतर तो नवरीला चिडवून दाखवण्यासाठी डान्स करून दाखवतो. तर दुसरीकडे नवरी आणि तिच्या कुटुंबाचे हावभाव हे बघण्यासारखे आहेत. प्रेमापुढे काही दिसत नाही असं म्हणतात ना ते इथं खरं ठरल्याचं दिसते. (google trend groom puts jaimala on bridesmaid netizens gone crazy video viral) 

आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'जर तू जीन्स घातलीस तर...', राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच...

its.chiku_या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. 33 लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ खऱ्या खुऱ्या लग्नातील नाही तर मुलांनी ठरवून केलेला प्रँक व्हिडओ आहे. (Trending Video)