पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Pm Narednra Modi Birthday) आज (17 September) वाढदिवस आहे. पंतप्रधानांच्या या वाढदिवसानिमित्त देशाला अनोखं गिफ्ट मिळालंय.70 वर्षांपूर्वी भारतातून लूप्त झालेले चित्ते आज पुन्हा भारतात परतलेत. (pm narendra modi given birthday gift to indians african cheetahs travel 8 thousand kilometers from namibia to india)
हे आफ्रिकन चित्ते नामिबियातून 8 हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झालेत. भारतातून 1952 साली चित्ते नामशेष झाले होते. चित्त्यांना भारतात परत आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indiara Gandhi) यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यासाठी परवानगी नाकारली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. त्यानंतर 2022 मध्ये प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) भारतात चित्ता प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या चित्तांशी संबंधित एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्याने व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा चित्ता भारतात परत येत आहे. शिकार पक्षांसाठी शेवटच्या लॉटची शिकार, अपंग आणि पाळीव प्राणी कसे होते ते पहा. सर्वप्रथम तुम्ही हा 1939 चा व्हिडीओ (व्हायरल व्हिडीओ) जरूर पहा...
When #Cheetah are coming back to #India. A look at how the last of the lots were hunted, maimed and domesticated for hunting parties. Video made in 1939. 1/n pic.twitter.com/obUbuZoNv5
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 16, 2022