Viral Video: भारतातील प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आणि इतिहास आहे. भारतातील विविधता अनुभवण्यासाठी हजारो -लाखे पर्यटक भारतभेटीवर येतात. भारताच्या पर्यटनक्षेत्रात वाढ होण्यासाठी सरकारदेखील प्रयत्न करत असते. थंडीच्या दिवसात राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. राजस्थानमधील महाल, संस्कृती, भाषा ही पर्यटकांना आकर्षित करत असतात. दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. अलीकडेच राजस्थानच्या संस्कृतीने प्रभावित झालेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणारी महिला कोण आणि कुठून आलीये याची मात्र काहीच माहिती नाहीये. ही महिला राजस्थानात फिरण्यासाठी आली होती. जेव्हापण परदेशी पर्यटक भारतात फिरण्यासाठी येतात तेव्हा इथली संस्कृती पाहून भारावून जातात आणि ते शिकण्याची त्यांची इच्छा होते. असाच काहीसा प्रयत्न या परदेशी महिलेने केला. तिने हिंदी गाणे शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यासोबत कोणीतरी प्रँक केला. जेव्हा ती तिला शिकवलेले गाणे गुणगुणायला सांगितले तेव्हा ते ऐकून लोकांना हसू अनावर झाले. तिने राजस्थानी गाणे गायचे सोडून कचरा साँग गाऊन दाखवले.
सोशल मीडियावर या महिलेच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला लोकांनी हिंदी गाणे गाण्याची विनंती केली. लोकांना अपेक्षित होते की महिला एखादे राजस्थानी गाणे गाईल. त्यामुळं लोकांनी तिला पल्लो लटके गाणं गायला सांगितले. मात्र, मोठ्या निरागसतेने तिने मला फक्त कचरा साँग लक्षात आहे असं सांगितले. त्यानंतर तिने गाडीवाला आया, घर से कचरा निकाल गाण गायला सुरुवात केली. हे गाण ऐकताच आजूबाजूच्या लोकांना हसू अनावर झाले.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. लोकांनी या परदेशी पर्यटकाची निरागसता खूपच भावली आहे. अनेकांनी म्हटलं आहे की कचरा साँग आहेच असं. सकाळ सकाळ ऐकल तर दिवसभर तुम्ही ते गुणगुणत बसाल.
भारतात स्वच्छ अभियानाअंतर्गंत घरातील कचरा घेऊन जाण्यासाठी कचऱ्याच्या गाड्या येतात. तेव्हा त्या गाड्यांमध्ये हे गाणं वाजवण्यात येते. हेच गाणे परदेशी महिलेने ऐकलं आणि शिकून घेतलं.