Trending News : नशीब ही फार विचित्र गोष्ट आहे. एखाद्याचं नशीब कधी पलटेल याचा काही नेम नसतो. तुम्ही लोकांना असे म्हणताना अनेकदा ऐकलेच असेल. असाच काहीसा प्रकार पंजाबमध्ये घडलाय. पंजाबमधील होशियारपूरमध्ये एका शेतकऱ्याचे नशीब चांगलच फळफळलं आहे. औषधे खरेदी करायला गेलेला हा शेतकरी काही तासांमध्येत कोट्यवधीश झाला आहे. श्रीमंत होण्याचे स्वप्न शेतकऱ्याचे अखेर पूर्ण झालं आहे. आता शेतकऱ्याच्या घरी अभिनंदनाचा महापूर आला आहे.
पंजाबच्या माहिलपूर येथील एका वृद्ध शेतकऱ्याने अडीच कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. शेतकरी शीतल सिंह 4 नोव्हेंबर रोजी होशियारपूरला त्यांची औषधे घेण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी गंमतीने लॉटरी काढली. त्यानंतर जेव्हा लॉटरी तिकीट दुकानदार एसके अग्रवाल यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली तेव्हा त्यांनी शीतल सिंग यांचेही नाव घेतले. शीतल सिंग यांना तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली होती. कुटुंबाला ही माहिती कळताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
शेतकरी शीतल सिंग यांनी सांगितले की, ते होशियारपूर येथे औषध खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी कोर्ट रोडवरील ग्रीन व्ह्यू पार्कच्या बाहेरील दुकानातून लॉटरी विकत घेतली होती. काही तासांनंतर त्याला कळले की ते विजेता आहेत आणि आता तो करोडपती झाले आहेत. शीतल सिंग यांच्या कुटुंबात दोन मुले आणि एका मुलगी आहे. हे सर्व विवाहित आहेत. बक्षिसाच्या रकमेचा वापर कसा करायचा याविषयी कुटुंबियांशी बोलणार असल्याचेही शीतल सिंग यांनी सांगितले.
दुसरीकडे, स्टॉल मालक एसके अग्रवाल यांनी सांगितले की, ते गेल्या 20 वर्षांपासून लॉटरी विकत आहेत आणि त्यांच्या आधी त्यांचे वडील लॉटरी विकायचे. त्याच्या स्टॉलवरून विकल्या गेलेल्या तिकिटाने तिसऱ्यांदा कोटींचे बंपर बक्षीस जिंकले आहे. शीतल सिंगचा नातू सुखप्रीत म्हणाला की, या लॉटरीमुळे कुटुंब खूप आनंदी आहे. आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ते एवढी मोठी रक्कम जिंकतील.