'या' राजीनाम्याला असं का म्हणतायत Short & Sweet ? फोटो पाहिलात का?

जिंकलस रे भावा!आतापर्यंतचा सर्वात भन्नाट राजीनामा, बॉससह कर्माचारीही पोट धरून हसतातय

Updated: Nov 15, 2022, 12:17 AM IST
'या' राजीनाम्याला असं का म्हणतायत Short & Sweet ? फोटो पाहिलात का? title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. जसे फोटो, व्हिडिओ, मीम्स. या व्हायरल गोष्टीमधून लोकांचे मनोरंजन होत असते. आता असाच मजेशीर फोटो व्हायरल होत आहेत. हा व्हायरल फोटो पाहून बॉससह कर्माचारीही पोट धरून हसतायला लागले आहे. या फोटोत नेमकं असं काय आहेत ते जाणून घेऊयात.

ऑफिस कल्चरमध्ये राजीनामा हा सर्वांत महत्वाचा मुद्दा असतो. हा राजीनामा दिला की तुम्ही तुमचं काम सोडून जातात. कधी तुम्हाला स्वत:हून राजीनामा द्यावा लागतो, तर कधी तुमच्याकडून जबरदस्तीने राजीनामा कंपनी घेत असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वत:हून राजीनामा देता, त्यावेळी तुम्ही कंपनीला चांगलाचं अॅटीट्यूड दाखवता. मात्र ज्यावेळेस कंपनी तुमच्याकडून डायरेक्ट राजीनामा घेते त्यावेळेस मात्र तुमची पंचाईत होती. त्यामुळे राजीनामा हा ऑफिस कल्चरमधला एक मजेशीर प्रसंग असतो.मजेशीर यासाठी की खाली दिलेला प्रसंग क्वचितच घडतो.  

व्हायरल फोटोत काय?  

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो राजीनाम्याचा आहे. या राजीनाम्याचा फोटो अनेक कर्मचाऱ्यांना आवडला आहे. त्यामुळे या राजीनाम्याची चर्चा आहे. 
 
राजीनाम्याच्या पत्रातला मजकूर खुपच हास्यास्पद आहे. या मजकूरात त्याने डिअर सर लिहलंय. यानंतर रेसिग्नेशन लेटर असे लिहत राजीनामा दिल्याचे सांगत बॉसला बाय बाय केलं आहे, आणि शेवटी स्वताची साईन केली आहे. आतापर्यंतचा सर्वात लहान राजीनामा म्हणून याकडे पाहिले जात आहे. 

कावेरी नावाच्या ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे. यासोबत एक कॅप्शनही शेअर केले आहे. या कॅप्शनमध्ये तिने 'छोटा आणि खूप गोंडस' असे लिहले आहे.व्हायरल झालेल्या या राजीनामा पत्रावर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.