मुंबई : आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये इंटरव्हूला जायचं असलं की, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमची माहिती. जी तुम्ही बायोडेटा किंवा CVच्या स्वरुपात देतात. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की, यासाठी लोकं वेगवेगळे शब्द उच्चारतात जसे की बायोडेटा, CV आणि Resume, मग यामधील योग्य शब्द कोणता? किंवा या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच असतो का? की वेगवेगळे असतात? असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो.
तर हे लक्षात घ्या ही या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. प्रथम Resume म्हणजे काय ते समजून घेऊ. रेझ्युमेमध्ये विशेषतः उमेदवाराचे शिक्षण, अनुभव आणि निवडक कौशल्ये यांची माहिती असते. यामध्ये प्रोफाइलबद्दल जास्त तपशील दिलेला नसतो. ते फक्त एक किंवा दोन पानांचे आहे. यामध्ये लिंग, वडिलांचे नाव, राष्ट्रीयत्व, जन्मतारीख, छंद यांची माहिती देण्याची गरज नाही.
आता CV म्हणजे CURRICULUM VITAE हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. ज्याचा अर्थ जीवनक्रम असा होतो. रेझ्युमेपेक्षा यामध्ये अधिक माहिती दिली आहे. रेझ्युमेमध्ये दिलेल्या माहितीशिवाय त्यामध्ये विशेष कौशल्ये, पूर्वीचा अनुभव आणि प्रोफाइलची माहिती दिली आहे. सहसा ते 3 पानाचे असते, परंतु अनुभवानुसार पान वाढवता येतात.
बायोडेटा म्हणजे बायोग्राफिकल डेटा हे 80 आणि 90 च्या दशकात अधिक वापरले गेले. साधारणपणे, उमेदवाराची प्राथमिक माहिती बायोडाटामध्ये दिली जाते. यामध्ये उमेदवाराची जन्मतारीख, धर्म, लिंग, पत्ता आणि तो विवाहित आहे की, नाही यासारख्या माहितीचा समावेश आहे. खर्या अर्थाने त्याचा उपयोग नोकऱ्यांसाठी केला जातो.
सध्या व्हिडीओ रिझ्युमेचा ट्रेंड आहे. अनेक कंपन्या उमेदवाराला व्हिडीओ रेझ्युमे पाठवायला सांगतात. हा एक प्रकारचा व्हिडीओ आहे. यामध्ये एक ते दोन मिनिटांत तुम्हाला स्वतःबद्दल, अनुभवाबद्दल आणि कौशल्यांबद्दल माहिती द्यावी लागेल. त्यामुळे हा व्हिडीओ बनवताना तुम्हाला काय म्हणायचे आहे ते क्रमाने ठरवा आणि ते रेकॉर्ड करा.