Delhi Murder Case: दिल्लीत भररस्त्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या हत्याकांडाचा घटनाक्रम सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. माथेफिरु आरोपीने पिडीतेवर चाकूने तब्बल २० वार केले त्यानंतर तिला दगडाने ठेचले. गुन्हा घडत असताना लोकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. साहिल तिच्यावर वार करत असताना लोकं दुर्लक्ष करुन पुढे जात होते. लोकांच्या या भूमिकेवरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. पिडीतेच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती इतकी हालाखीची आहे की तिचे अत्यंसंस्कार करण्यासाठीही त्यांनी कर्ज काढले होते.
पिडीतेवर शवविच्छेदन झाल्यानंतप पोलिसांनी तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना सोपवला. त्यानंतर ते मुलीवर अत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात नेले. लेकीवर अत्यंविधी पार पडून परत निघताना तिथल्या कर्मचाऱ्याने तिच्या वडिलांकडे ३, ५०० रुपये शुल्क मागितले. मात्र, त्यांच्याकडे तितकेही पैसे नव्हते. त्यांनी हात जोडून त्याला शुल्क कमी करण्यास सांगितले.
नादुरुस्त शिवशाहीमध्ये चालकाने संपवले आयुष्य; आता समोर आले खळबळ उडवणारे कारण, महिला वाहक...
स्मशानात उपस्थित असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी अखेर पैसे गोळा करत त्या केअर टेकरला दिले. तिथे उभे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्या कर्मचाऱ्याला पैसे कमी करण्यास सांगितले. तेव्हा त्याने तीन हजार रुपये देण्यास सांगितले. तेव्हा तिथे असलेल्या नातेवाईकांनीच हे पैसे भरले. आपल्या लेकीच्या अत्यसंस्कारही कर्ज घेऊन केल्याने त्या बापाच्या मनाला आतोनात वेदना होत होत्या.
मुलीवर अत्यंसस्कार करण्यासाठीही माझ्याजवळ पैसे नव्हते. मी शेजारी व नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी पुढे म्हटलं की, आता आमचा एकच मुलगा आहे. तो १२ वर्षांचा असून अद्याप शाळेत शिकत आहे. मुलीने यावर्षीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती खूप हुशार होती तिला वकिल बनायचं होतं. तिने जेव्हा तिची इच्छा मला सांगितली तेव्हा मी तिच्या डोक्यावर हात ठेवून तुला जे शिकायचं आहे ते शिक, मी अजून मेहनत करेन, असं म्हटलं होतं. लेकीची आठवण सांगतानाही त्या बापाच्या डोळ्यात पाणी भरलं होतं.
शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, पुणेकर आजोबांनी स्वतःचं आयुष्य संपवलं
माझी मुलगी हुशार होती. ती फक्त तिच्या कामाशी काम ठेवत होती. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा ती शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या घरी गेली होती. मला नाही वाटत आरोपी मुलासोबत तिची मैत्री होती. जर तो तिचा मित्र असता तर तिची अशी निर्घृण हत्या केली नसती, असं पीडित मुलीचे वडिल म्हणाले आहे.