नवी दिल्ली : प्रेमामध्ये कोण काय करेल काही सांगता येत नाही, त्यात जर एकतर्फी प्रेम असेल तर 'देवदास' झालेले तरूण मुलीच्या होकारासाठी कोणतेही पाऊल उचलतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीजवळ असलेल्या नोएडामध्ये घडला आहे. (Crime news love affair video call threat )
एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या मनोज नेपाली या तरूणाने पीडित मुलीला फोन करून मैत्री करायची असल्याचं म्हणत होता. मात्र मुलीने यासाठी नकार दिला त्यानंतर तिने त्याला ब्लॉक केलं होतं, तरीही तो वेगवेगळ्या नंबरवरून फोन करायचा.
एके दिवशी तिला अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल आला. फोन उचलल्यावर मनोजने प्रपोज केलं, तेव्हाही पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यावेळी प्रेमात वेड्या झालेल्या मनोजने चाकू काढला आणि माझ्याशी मैत्री कर नाहीतर मी माझ्या हाताची नस कापून आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने फोन कट केला. तिथेच तिचा थरकाप उडाला होता.
दरम्यान, संबंधित मुलीने मनोजविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज हा आगाहपुरचा असून हे प्रकरण नोएडाच्या सेक्टर-39 चे आहे.