CORONA VACCINATION - देशात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम, आज तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली लस

लसीकरणाला देशवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, एकाच दिवसात लसीकरणाचा विक्रम

Updated: Jun 21, 2021, 10:28 PM IST
CORONA VACCINATION - देशात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम, आज तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली लस title=

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. देशात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज एका दिवसात तब्बल 84 लाख 07 हजार 420 लोकांनी कोरोनाची लस घेतली असून आतापर्यंतचा लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. 16 जानेवारीपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत देशात 28 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशवासीयांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी 'वेल डन इंडिया' असं म्हटलं आहे. कोरोनाच्या लढाईत लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्या सर्वांचे अभिनंदन, तसेच सर्वच फ्रंटलाईन वर्कर्संचेही कौतुक, असे मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे. 

आज एका दिवसात झालेलं लसीकरण
मध्यप्रदेश - 14 लाख 71 हजार 936
कर्नाटक -10 लाख 36 हजार 523
उत्तर प्रदेश - 6 लाख 57 हजार 689
राजस्थान - 4 लाख 22 हजार 347
गुजरात - 4 लाख 97 हजार 078
महाराष्ट्र - 3 लाख 75 हजार 144
मुंबई - 81 हजार 985
 
आतापर्यंत 28 कोटीहून जास्त नागरिकांचं लसीकरण
देशातील 28 कोटी 33 लाख 13 हजार 942 लोकांना आतापर्यंत लस मिळालीय. यात पहिला डोस घेतलेले नागरिक 23 कोटी 27 लाख 44 हजार 813 इतके आहेत. तर 5 कोटी 5 लाख 69 हजार 129 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
 
सर्वांसठी मोफत लसीकरण मोहिम
केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी मोफत लसीकरण’ मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि युवकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तरच आपण कोरोनावर मत करू शकतो, असं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.