मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला असून १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा वाढवलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत होता. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढवला आहे.
In Orange Zones, in addition to activities permitted in Red Zone, taxis&cab aggregators will be permitted with 1 driver&1 passenger only: Ministry of Home Affairs on extension of #lockdown for two weeks from May 4 pic.twitter.com/09w8PdzqwD
— ANI (@ANI) May 1, 2020
लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसला. या सगळ्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. काही ्प्रमाणात नियम शिथिल करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली. रेड झोनमधील काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत.
A limited number of activities will remain prohibited across India, irrespective of the zone, including travel by air, rail, metro & inter-State movement by road; running of schools, colleges, & other educational & training/coaching institutions: MHA pic.twitter.com/R6DYKTcs36
— ANI (@ANI) May 1, 2020
पंजाबने लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय अगोदरच घेतला होता. १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. नागरिकांनी या काळातही आता सहकार्य केलं त्याप्रमाणे घरात राहून सहकार्य करायचं आहे. चार तास दुकानं उघडणार असल्यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.