कासगंज : सगळीकडे 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना
या आनंदाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दोन समुदायात बाईक रॅली दरम्यान गोंधळ झाला. यावेळी दोन्ही गटांनी दगड फेक करून गोळीबार देखील केला. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी तातडीने त्या परिसरात कर्फ्यू जाहिर केला आहे. पोलिस सर्व परिसरात याची घोषणा करत आहे. या घटनेवेळी 3 स्कॉर्पिओ आणि 6 बाईकची तोडफोड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात मोठी रॅली काढण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच भाजपचे राजवीर सिंह कासगंज पोहोचले. सिंह यांच्या मते, ही घटना पूर्व नियोजित आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही शांत बसणार नाही.
युवकांमध्ये काही गोष्टींवरून गोंधळ झाला. आणि वाद भांडण आणि थेट गोळीबारवर पोहोचला. तेव्हा एका तरूणाला इजा झाली. आणि अनेक गाड्यांची तोडफोड देखील झाली. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार सकाळी 10 वाजला एका समुह 36बाईक घेऊन प्रजासत्ताक दिनाची रॅली घेऊन निघाले होते. जेव्हा ही रॅली शहरात पोहोचली तेव्हा तेथे दुसरा समुह देखील होता. काही कारणांवरून त्यांच्या वाद झाला आणि वादाला सुरूवात झाली.