रेल्वेची धुरा गडकरींच्या 'समर्थ' हातांमध्ये जाणार?

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासह मोठे फेरबदलही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Updated: Sep 1, 2017, 06:02 PM IST
रेल्वेची धुरा गडकरींच्या 'समर्थ' हातांमध्ये जाणार?

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासह मोठे फेरबदलही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

अपघातांच्या मालिकेमुळं वादात सापडलेल्या सुरेश प्रभूंच्या रेल्वे खात्याचा कार्यभार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.

तर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांना बढती देण्यात येणार असून संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात येण्याची चिन्ह आहेत.

तर सुरेश प्रभू यांना उमा भारती यांचे जलसंपदा खाते सोपवले जाण्याची शक्यता आहे.