मुंबई : लग्नसमारंभात धमाल मस्ती ही असतेच. नातेवाईकांपासून ते मित्रांपर्यंत सर्वचजण लग्नात मजा करतात. ऐवढंच काय तर वधू-वरांचे मित्र मैत्रीण देखील सगळ्या गोष्टींची मजा घेत असतात. यासंबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. ज्यामध्ये नववधूचा मूड बिघडताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधू-वर स्टेजवर बसले आहेत. त्यावेळी नवरदेवाचे मित्र त्या दोघांनाही लग्नाची भेट वस्तू देतात. ती भेटवस्तु नववधू स्टेजवरतीच उघडते. परंतु ती भेट वस्तु उघडताच नववधूच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो.
पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधूने भेटवस्तूची पॅकिंग केली असता, वराचे मित्र ओरडू लागतात. त्याच वेळी, भेटवस्तू पाहून, वधूचा मूड खराब होतो आणि ती वस्तू बाजूला फेकते.
हे प्रकरण इथेच संपत नाही, हे सर्व घडल्यानंतर नवरदेवाचा एक मित्र वधूला चिडवण्यासाठी भेटवस्तू परत तिच्या मांडीवर ठेवतो. मात्र, नंतर नववधूचा खराब मूड पाहाता ते मित्र तिच्या मांडीवरील वस्तू स्वत:हून काढून टाकतात.
हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. तो प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सकडून याला खूप पसंती मिळत आहे.
यासोबतच यावर अनेक कमेंट्सही लिहिल्या जात आहेत. काही लोक म्हणत आहेत की, ही खूपच वाईट भेट वस्तू आहेत. त्याच वेळी, काही वापरकर्ते वधूला गर्विष्ठ आणि संतप्त म्हणत आहेत.