38,78,79,54,030... भारत करणार जगातील सर्वात मोठी डील! मुस्लिम देशाला देणार आपले 'ब्रह्मास्त्र'

भारत मुस्लिम देशाला आपले 'ब्रह्मास्त्र'  देणार आहे. 38,78,79,54,030 एवढ्या किंमतीची ही जगातील सर्वात मोठी डील असेल. 

वनिता कांबळे | Updated: Jan 13, 2025, 06:46 PM IST
38,78,79,54,030... भारत करणार जगातील सर्वात मोठी डील! मुस्लिम देशाला देणार आपले 'ब्रह्मास्त्र' title=

Brahmos Deal:  भारताने जगातील सर्वात मोठी डील केली आहे. 38,78,79,54,030 एवढ्या किंमतीची ही डील आहे. या बदल्यात भारत एका सर्वात मोठ्या मुस्लिम देशाला आपले 'ब्रह्मास्त्र' देणार आहे. भारताच्या मदतीने हा मुस्लिम देश आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. जाणून घेऊया हा देश कोणता ज्याने भारतातासोबत हा मोठा करार केला आहे.

भारताने निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांची जगभरात चर्चा आहे.  'ब्रह्मास्त्र' हे भारताकडे असलेले सर्वात शक्तीशाली आणि घातक क्षेपणास्त्र आहे. इंडोनेशियाने भारताककडून    'ब्रह्मास्त्र' हे विकत घेतले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत दैऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते भारताचे सर्वात धोकादायक शस्त्र 'ब्रह्मोस' खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब करू शकतात. गेल्या महिन्यात भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान या दीर्घकालीन करारावर चर्चा झाली होती.  वेग आणि अचूकतेसाठी ओळखले जाणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र इंडोनेशियाच्या किनारपट्टी आणि सागरी संरक्षणा क्षमता वाढवेल अशी पोस्ट इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री सजाफरी सजामसोदीन यांनी केली आहे. यामुळे  इंडोनेशिया आणि भारतातील ही डील निश्चित असल्याचे बोलले जात आहे. 

इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सुमारे 38 अब्ज रुपयांच्या ब्रह्मोस डीलबाबत भारताला पत्र पाठवल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. SBI किंवा इतर कोणत्याही भारतीय राष्ट्रीय बँकेकडून या करारासाठी भारत इंडोनेशियाला कर्ज देण्याची शक्यता आहे. EXIM बँक सुरुवातीला इंडोनेशियाला कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू करणार होती. मात्र, हे प्रत्यक्षात हे शक्य झाले नाही. 

सुबियांतोच्या भारत दौऱ्यादरम्यान या मोठ्या कराराची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो आमंत्रित करण्यात आले आहे.  हा करार झाल्यास भारातकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा देश असेल. यापूर्वी फिलिपाइन्स या देशाने भारताकडून ब्रम्हास्त्र खरेदी केले आहे. भारताने जानेवारी 2022 मध्ये फिलीपिन्ससोबत  375 दशलक्ष डॉलर किंमतीचा महत्त्वाचा करार केला होता. हा भारताचा पहिला मोठा संरक्षण निर्यात करार होता. यासह भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी 700 दशलक्ष डॉलर्सचा करार अंतिम टप्प्यात आहे.