Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) असून, त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी एका कार्यकर्त्याला बिस्किट दिलं आहे. या व्हिडीओवरुन भाजपाने (BJP) राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. याचं कारण कार्यकर्त्याला बिस्कीट देण्याआधी राहुल गांधींनी ते श्वानाला दिलं होतं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेने आपल्या एक्स अकाऊंवर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. झारखंमध्ये यात्रा असताना राहुल गांधींना भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. दरम्यान यावेळी राहुल गांधींसह गाडीच्या टपावर एक श्वानही होता. राहुल गांधी यांनी या श्वानाला भरवण्यासाठी बिस्किटचा पुडा मागितला.
यानंतर राहुल गांधी श्वानाला बिस्किट भरवत होते. दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांच्याशी बोलण्याचा, फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एका समर्थकाशी बोलत असताना राहुल गांधी श्वानाला बिस्किट भरवत होते. पण श्वानाने खाण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींनी तेच बिस्कीट समर्थकाला दिलं.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. काँग्रेस नेता आपल्या समर्थकांना योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. एकेकाळी काँग्रेस नेते असणाऱ्या हेमंत बिस्वला सरमा यांनी राहुल गांधींवर टीका करताना ते आणि त्यांचं कुटुंब मला बिस्किट भरवू शकलं नाही असं म्हटलं आहे. "मी आसामचा एक अभिमानी नागरिक असून, मी ते बिस्किट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसमधून राजीनामा दिला," असं हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आहेत.
Pallavi ji, not only Rahul Gandhi but the entire family could not make me eat that biscuit. I am a proud Assamese and Indian . I refused to eat and resign from the Congress. https://t.co/ywumO3iuBr
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) February 5, 2024
हिमंता बिस्वा सरमा यांनी अनेकदा भूतकाळातील घटनेचा उल्लेख केला आहे, ज्यात त्यांनी दावा केला होता की राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान पाळीव कुत्रा पिडीला प्लेटमधून बिस्किटे देण्यात आली होती, जी नंतर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांना देण्यात आली होती.
हिमंता बिस्वा सरमा यांनी यावरुन राहुल गांधी आपल्या पक्षाप्रती किती गंभीर आहेत अशी विचारणा केली आहे. यामुळेच आपण पक्ष सोडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी काही दिवसांपूर्वी कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्यांना बूथ एजंट करा असा सल्ला दिला होता. त्याचा संदर्भ घेत भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. "काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्याशी केली होती आणि आता राहुल गांधी आपल्या दौऱ्यात कुत्र्याला बिस्किट भरवत आहेत आणि खाण्यास नकार दिल्यानंतर कार्यकर्त्याला देत आहेत," असं त्यांनी एक्सवर लिहिलं आहे.
अभी कुछ दिन पहले कांग्रेस अध्यक्ष खड़गे जी ने पार्टी के बूथ एजेंटों की तुलना कुत्तों से की और यहाँ राहुल गांधी अपनी यात्रा में एक कुत्ते को बिस्किट खिला रहे हैं और जब कुत्ते ने नहीं खाया तो वही बिस्किट उन्होंने अपने कार्यकर्ता को दे दिया।
जिस पार्टी का अध्यक्ष और युवराज अपने… pic.twitter.com/70Mn2TEHrx
— Amit Malviya (@amitmalviya) February 5, 2024
"जर पक्षाचा अध्यक्ष आणि प्रिन्स पक्षाच्या कार्यकर्त्यांना श्वानाप्रमाणे वागवत असतील तर पक्षाची वाताहत होणं नक्की आहे," अशीही टीका त्यांनी केली आहे.