Crime News In Marathi: सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या चुलत भावाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच चर्चा आहे. तर, हत्येचे कारण ऐकून कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीमुसार, मयत सहा वर्षांच्या मुलीच्या चुलत भावानेच तिची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. तापासात, बलात्काराच्या प्रयत्नात त्याने हत्या केल्याचे समोर आले. आरोपीने पॉर्न पाहिल्यानंतर बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीहा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.
पीडितेच्या वडीलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सहा वर्षांची मुलगी तिच्या काकांच्या 14 वर्षांच्या मुलासोबत झोपली होती. जेव्हा सकाळी कुटुंबातील इतर सदस्य झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांनी पाहिले की मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मुलीचा मृत्यू हा गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत असतानाच त्यांचा मयत मुलीच्या चुलत भावावर संशय आला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. आरोपीने दिलेल्या जबाबानुसार, तो गेल्या दोन दिवसांपासून पॉर्न व्हिडिओ पाहत होता. त्यानंतर वाईट हेतूने त्याने बहिणीला झोपेतून उठवले आणि बाहेर घेऊन जात होता. मात्र, त्याचदरम्यान बहिणीची झोपमोड झाली आणि ती जोरजोरात ओरडायला लागली.
मुलीने ओरडण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपी घाबरला. आपल्याबद्दल घरात सगळ्यांना कळेल या भीतीने त्याने तिची गळा दाबून हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या ओठांवर आणि छातीवर हल्ल्याचे निशाण सापडले आहेत. अल्पवयीन मुलाने शुक्रवारी झोपलेल्या आपल्याच बहिणीला वाईट हेतूने झोपेतून उठवले. मात्र तिने आरडाओरडा करण्यास सुरु करताच तिची हत्या केली. अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.